सह्याद्रीचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर ‘या’ गडाला नक्की भेट द्या!

| Updated on: Feb 05, 2024 | 3:26 PM

सह्याद्रीचं रांगडं रुप, त्याचा राकटपणा आणि कणखरपणा अनुभवायचा असेल तर रतनगडाला एकदा नक्की भेट द्या. सह्याद्रीतील हे एक अनमोल रत्न आहे. इथला ट्रेक चिरकाल स्मरणात राहील असाच आहे.

1 / 6
सह्याद्रीचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर एकदा तरी रतनगडाला नक्की भेट द्या. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हा किल्ला आहे. भंडारदरा धरणाच्या मागे आणि सह्याद्रीच्या मुख्य कणावर हा किल्ला आहे. या गडाच्या उजवीकडे असलेला सुळका हा रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो.

2 / 6
भंडारदरा परिसरातील अनेक निसर्गदरम्य ठिकाणं पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. मात्र तिथेच दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर फार मोजके पर्यटक पोहोचतात. ट्रेकर्सची इच्छाशक्ती, शारीरिक क्षमता यांची परीक्षा घेणारा हा किल्ला आहे.

3 / 6
रतनगडाच्या नेढ्यातून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. नेढा म्हणजेच डोंगराला असलेलं आरपार भोक. या नेढ्यातून वाहणाऱ्या वाऱ्याचा थरार अनुभवण्यासारखा असतो.

4 / 6
गडावरील गणेश दरवाजातून शिडीच्या वाटेने खाली उतरून पायवाटेने जंगलातून दीड ते दोन तासात रतनवाडीत पोहोचता येतं. रतनवाडीमधील एक अद्भुत मंदिर म्हणजे अमृतेश्वर मंदिर. दहाव्या आणि अकराव्या शतकात झांज राजांनी 12 नद्यांच्या उगमाजवळ जी बारा मंदिरं बांधली, त्यातील प्रवरेच्या उगमाजवळ हे मंदिर आहे.

5 / 6
या मंदिराच्या फक्त दर्शनानेच सर्व थकवा दूर होतो. हे मंदिर शिल्पकलेनं नटलेलं आहे. रतनगड हे नाव गडावर अधिष्ठापित असलेल्या रत्नाई देवीमुळे आहे. गडावरील रत्नाई गुहेत किंवा शेजारील गुहेत राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. सुट्ट्यांमध्ये अनेक ट्रेकिंग ग्रुप्स इथे मुक्कामाला असतात.

6 / 6
इंग्रजांचं राज्य येण्यापूर्वी मराठ्यांच्या काळात या रतनगडाला खूप महत्त्व होतं. नानासाहेबांच्या काळात बालाजी कराळे हे पेशवाईमधील रतनगडाचे किल्लेदार होते. हल्ली रतनगड हा तमाम ट्रेकर्सचं सर्वांत आवडतं डेस्टिनेशन आहे.