‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ नांदेडमध्ये संत बाळूमामाच्या पालखीचा सोहळा थाटात संपन्न

| Updated on: Apr 08, 2022 | 8:28 AM

मागिल दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्याने सणांवर त्याच प्रमाणे देवस्थांनावर बंधने आणण्यात आली होती. कोरोना निर्बंध कमी केल्यानंतर दोन वर्षांनंतर नांदेडमध्ये संत बाळूमामाच्या पालखीचा सोहळा चांगलाच रंगलाय.

1 / 5

2 / 5
किनवट तालुक्यातील भिसी गावात या सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला होता. बाळू मामांच्या पालखी आणि मानाच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी शेजारच्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

3 / 5
यावेळी महिला पारंपारिक वेश परिधान करुन फुगड्या घालत आनंद व्यक्त करताना दिसल्या, त्याच प्रमाणे यावेळी मानाच्या अश्वाची मनोभावे पूजा करण्यात आली. सर्वकडे भक्तीभावचे वातावरण पाहायला मिळाले.

4 / 5
 यावेळी मोठया प्रमाणात अन्नदान करत पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आलीय. भाविकांच्या मनातील आनंदी भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

5 / 5
कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे संत बाळूमामा  यांचे गांव. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला.