Photo : महाराष्ट्रातील या शहरात फक्त 51 रुपयात मिळतेय साडी, दुकानासमोर महिलांची प्रचंड गर्दी

Saree : महिलांना नेहमीच स्वस्त आणि चांगली साडी खरेदी करणे पसंत असते. अशातच आता महाराष्ट्रातील एका शहरात चक्क 51 रुपयांना साडी मिळत असल्याचे समोर आले आहे. साडी खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली असल्याचेही समोर आले आहे.

| Updated on: Feb 27, 2026 | 4:23 PM
1 / 5
जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील एका कापड दुकानदाराने 51 रुपयात साडीची ऑफर ठेवल्याने महिलांनी दुकानासमोर साडी खरेदीसाठी गर्दी केली होती.

जालना शहरातील जुना मोंढा परिसरातील एका कापड दुकानदाराने 51 रुपयात साडीची ऑफर ठेवल्याने महिलांनी दुकानासमोर साडी खरेदीसाठी गर्दी केली होती.

2 / 5

मात्र गर्दीचे नियोजना न करता या दुकानदाराने ऑफर ठेवल्याने पोलिसांनी या दुकानदाराला समज दिली आहे. कारण या ऑफरमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात महिला पोहोचल्याने अनेकांना त्रासाचा सामना करावा लागला.

3 / 5

जालना शहरातील जुन्या मोंढा परिसरातील एका कापड दुकानदाराने महिलांना 51 रुपयात साडी देणार असल्याची ऑफर ठेवली होती. ही बातमी समजताच परिसरातील अनेक महिला खरेदीसाठी या ठिकाणी पोहोचल्या होत्या.

4 / 5

दुकानदाराच्या ऑफरमुळे महिलांची मोठी गर्दी झाली, मात्र गर्दीच नियोजन न केल्यामुळे पोलिसांनी या दुकानदाराला चांगलीच समज दिली. समज दिल्यानंतर या दुकानदाराने आपण ऑफर बंद करणार असल्याच पोलिसांना सांगितलं.

5 / 5

दुकानदाराच्या या ऑफरचे आणि दुकानासमोरील महिलांच्या गर्दीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us