Photo : ‘सांग तू आहेस का’ मालिकेत लगीन घाई, पाहा स्वराज आणि कृतिकाचा रॉयल लूक

मराठी मालिकांमधील ‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. (see Swaraj and Kritika's Royal Look, Sang tu ahes ka Serial)

VN | Updated on: Mar 24, 2021 | 4:58 PM
1 / 5
मराठी मालिकांमधील ‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. रसिक प्रेक्षकांकडून या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम मिळत आहे.

मराठी मालिकांमधील ‘सांग तू आहेस का’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. रसिक प्रेक्षकांकडून या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम मिळत आहे.

2 / 5

आता या मालिकेत अधिक धमाल अनुभवता येणार आहे. कारण आता लवकरच स्वराज आणि कृतिकाच्या लग्नाची धामधूम मालिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र या लग्नातही मोठा ट्विस्ट दडलेला आहे.

3 / 5

डॉ वैभवीला स्वराजपासून दूर ठेवण्यासाठी सुलू हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. लग्नात तर तिने वैभवीला जीवे मारण्याचा घाटच घातला आहे. वैभवीचा जीव वाचवण्यात स्वराज यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

4 / 5

लग्नातला हा ट्विस्ट उत्कंठावर्धक आहेच पण स्वराज कृतिकाच्या रॉयल लग्नासाठी त्यांचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. पारंपरिक नऊवारी साडीतील कृतिका आणि डिझायनर शेरवानी परिधान केलेला स्वराजचा लूक लक्ष वेधून घेत आहे.

5 / 5

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर काही दिवसांपूर्वीच मिताली मयेकरसोबत विवाहबंधनात अडकला. आता पुन्हा एकदा मालिकेतल्या लग्नासाठी तो सज्ज झाला आहे. सिद्धार्थ साकारत असलेल्या स्वराज या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us