ना जंगल, ना गुहा… थेट घरातच सापांचा संसार! जगातील ‘या’ गावाचं रहस्य काय? थक्क करणारी परंपरा…

आपण सर्वच जण सापांना घाबरतो. पण आपल्याच महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथल्या घरात माणसांपेक्षा जास्त साप राहतात. ते ना चावत, ना काही त्रास देत.जाणून घ्या या गावाची ही थक्क करणारी गोष्ट

| Updated on: Oct 17, 2026 | 9:22 PM
1 / 7
या गावात माणसांपेक्षा प्रत्येक घरात सापांची संख्या जास्त आहे. घरातील प्रत्येक जण या सापांसोबत आनंदाने राहतो. हे जगातील अनोखे गाव महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतफळ येथे आहे. ज्याला सापांचे गाव म्हणून ओळखले जाते.

या गावात माणसांपेक्षा प्रत्येक घरात सापांची संख्या जास्त आहे. घरातील प्रत्येक जण या सापांसोबत आनंदाने राहतो. हे जगातील अनोखे गाव महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतफळ येथे आहे. ज्याला सापांचे गाव म्हणून ओळखले जाते.

2 / 7

कोब्रा सापांचा मुक्त संचार : या गावात अत्यंत विषारी असलेले भारतीय कोब्रा घरात, अंगणात, रस्त्यांवर आणि अगदी शाळांमध्ये मुलांच्या वर्गातही मुक्तपणे फिरतात.

3 / 7

या गावात नवीन घर बांधताना छतामध्ये किंवा भिंतीमध्ये सापांना राहण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी एक विशेष मोकळी जागा सोडली जाते. ज्याला देवस्थानम् म्हणतात.

4 / 7

नागांना मारण्याऐवजी त्यांचा आदर करण्याची परंपरा : शेतपाळ या गावात नागांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे साप दिसल्यावर त्याला मारण्याऐवजी इथले लोक त्यांची पूजा करून नमस्कार करतात. ही पिढ्यांपिढ्या चालत आलेली परंपरा आहे.

5 / 7

नागपंचमी आणि महाशिवरात्रीला विशेष महत्त्व :या सणांच्या दिवशी या गावात मोठा उत्सव असतो.100 वर्षे जुने नाग येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. नागपंचमी आणि महाशिवरात्रीला भगवान शंकराचे रूप मानून येथे सापांना पुजले जाते.

6 / 7

शेतपाळ गावात नाग चावल्याची एकही घटना नाही? :सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजपर्यंत या गावात सापाने कोणत्याही माणसाला चावल्याचे किंवा दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली नाही.

7 / 7

टीप: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us