प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 42 वर्षांची असून सुद्धा श्वेतानं तिच्या सौंदर्यानं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.
श्वेताचे स्विमसूटमधील हॉट ॲण्ड सेक्सी फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिचं वय 42 आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
श्वेता तिचा लहान मुलगा रेयांशसोबत स्विमिंग पूलमध्ये धमाल करताना दिसत आहे.
श्वेताचे स्विमिंग पूलमधील फोटो इतके आकर्षित आहेत की चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. विशेष म्हणजे श्वेतानं हॉटनेसमध्ये तिची मुलगी पलकलाही मागे टाकलंय
सध्या श्वेताचे हे हॉट फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.