Ranabaali : विजय आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रिने प्रेक्षकांना लावले वेड, पण सिनेमाच्या कथेवर प्रेक्षकांची नाराजी का?
विजय आणि रश्मिकाचा लग्नानंतर 'रणबली' हा सिनेमा सिनेमागृहात आज रिलीज झाला आहे. आपल्या आवडत्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी सिनेमागृहात प्रचंड गर्दी केली आहे.पण काही प्रेक्षकांनी याच्या कथेवर आणि लांबट कथानकावर प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आली आहे. लग्नानंतर एकत्र या जोडीचा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्यांच्या 'रणबाली' या चित्रपटबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आज हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
चाहत्यांनी पहिल्याच दिवशी हा सिनेमाला भरपूर प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकांनी या सिनेमाबद्दल आपले रिव्ह्यू देखील दिले आहेत.
विजय- रश्मिकाच्या केमिस्ट्रिने जिंकली मने :रणबाली मध्ये विजय देवरकोंडा हा सिंगनमाला बोब्बिली रणबाली या योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे. तर रश्मिका मंदाना जयम्माची भूमिका साकारत आहे. दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. काही प्रेक्षक तर खास यांना पाहण्यासाठी सिनेमा बघायला येत आहेत. तर काही प्रेक्षका रश्मिकाच्या अभिनयाचं आणि स्थानिक भाषेतील तिच्या संवादफेकीचं कौतुक करत आहेत.
कोणाला विजय- रश्मिकाची जोडी प्रचंड आवडली आहे. तर कोणाला या सिनेमाची कथा आणि लांबी खटकली आहे.सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या सिनेमाचे कौतुक जरी केले असले तरी काहींनी त्यांना स्लो जाणाऱ्या कथेवर नाराजी व्यक्त केली आहे.
यातील मुख्य कलाकार जरी चांगले असले तरी स्लो कथानक आणि पटकथा, गरज नसताना उगाच ताणलेला सिनेमा यांवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटातील प्रसंगाचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवर हवा तसा झालेला नाही. चित्रपटांतील युद्धाचे प्रसंग आणि अजय- अतुल यांचे पार्श्वसंगीत यांवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
काय आहे 'रणबाली' ची कथा : दिग्दर्शक राहूल सांकृत्यायन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 1876 ते 1878 या काळात मद्रासमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळावर ही कथा आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या योद्धाची गोष्ट या सिनेमात दाखवली आहे.
एकीकडे ऐतिहासिक पार्श्वभूमी, विजय - रश्मिकाची जोडी आणि दमदार अभिनयाची चर्चा आहे, तर दुसरीकडे स्लो चालणारा सिनेमा आणि त्याची लांबी यांवर प्रेक्षकांनी नापंसती दर्शवली आहे. त्यामुळे रणबाली या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून, चित्रपट पुढे किती कमाई करतो यांकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.