Marta Kostyuk ची फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक, Elina Svitolina चा पराभव
French Open 2026 : युक्रेनच्या मार्ता कोस्त्युक हीने धमाका केला आहे. मार्ताने क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. आता फायनलला कोण पोहचणार? हे 4 जून रोज निश्चित होणार आहे.

प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीचा निकाल समोर आला आहे.उपांत्य पूर्व फेरीत मार्ता कोस्त्युक हीने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक गिली. मार्ता कोस्त्युक हीने तिची आदर्श असलेल्या एलिना स्वितोलिनावर मात केली. (Photo Credit : GETTY IMAGES)

मार्ता कोस्त्युक हीने उपांत्य पूर्व सामन्यात एलिनावर 6-3, 2-6 आणि 6-2 अशा फरकाने मात केली. मार्तासमोर आता सेमी फायनलमध्ये रशियाचया मीरा एंड्रीवा हीचं आव्हान असणार आहे. (Photo Credit : GETTY IMAGES)

मार्ता कोस्त्युक हीने पहिला सेट 6-3 अशा फरकाने आपल्या नावावर केला. मात्र मार्ताला दुसरा सेट 4 गुणांनी गमवावा लागला. मार्ताने दुसरा सेट 2-6 ने गमावला. मात्र मार्ताने तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये जोरदार पलटवार केला आणि 6-2 फरकाने सामना जिंकला. (Photo Credit : GETTY IMAGES)

मार्ता कोस्त्युक हीने तीचा विजय यु्क्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यातील मृतांना समर्पित केला. युक्रेनसाठी ती रात्र विसरणं फार अवघड आहे. अनेक जण हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असं म्हणत मार्ताने संवेदना व्यक्त केला. (Photo Credit : GETTY IMAGES)

आता मार्ता सेमी फायनलसाठी सज्ज झाली आहे. मार्तासमोर रशियाच्या खेळाडूंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दोघींपैकी कोण अंतिम सामन्याचं तिकीट मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंतिम सामना हा 4 जून रोजी होणार आहे. (Photo Credit : GETTY IMAGES)