M S Dhoni | महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे आऊट? कॅप्टन्सीसाठी या दोघांनी नाव आघाडीवर

चेन्नई सुपर किंग्स टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्या गुडघ्यात दुखापत झाल्याची माहिती कोच स्टीफन फ्लेमिंग याने दिली होती. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे येत्या सामन्यातून बाहेर पडावं लागू शकतं.

| Updated on: Apr 14, 2023 | 8:52 PM
1 / 5
चेन्नई सुपर किंगसचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला गुडघ्यात दुखापत झाली आहे. त्यामुळे धोनीला काही सामन्यांना मुकावं लागण्याची शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंगसचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला गुडघ्यात दुखापत झाली आहे. त्यामुळे धोनीला काही सामन्यांना मुकावं लागण्याची शक्यता आहे.

2 / 5

धोनीला झालेल्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे धोनीला बाहेर बसावं लागलं तर कॅप्टन्सी कोण करणार, असा सवाल उपस्थित होतो.

3 / 5

धोनी बाहेर झाल्यास कर्णधारपदासाठी टीममध्ये 2 प्रबळ दावेदार खेळाडू आहेत. एक म्हणजे स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा तर दुसरा मराठमोळा ऋतुराज गायकवाड.

4 / 5

रविंद्र जडेजा याने या मोसमात आतापर्यंत 4 सामन्यात 29 धावा केल्या आहेत. तर 6 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5

तर ऋतुराज गायकवाड याने 4 मॅचमध्ये 197 धावा केल्या आहेत. ऋतुराज सातत्याने धावा करतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us