Icc Champions Trophy इतिहासातील सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज, रोहित-विराटचा कितवा नंबर?
Most Centuries In Champions Trophy History : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी आहे. या निमित्ताने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांची नावं जाणून घ्या

आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचं यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेत टीम इंडियासह एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. अफगाणिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. (Photo Credit : Andrew Matthews/PA Images via Getty Images)

या स्पर्धेतील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. आतापर्यंत फक्त इंग्लंडनेच या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेनिमित्ताने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit : Harry Trump-ICC/ICC via Getty Images)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात टीम इंडियासाठी शिखर धवन आणि सौरव गांगुली, दक्षिण आफ्रिकेसाठी हर्षल गिब्स आणि विंडीजसाठी ख्रिस गेल या सर्व फलंदाजांनी प्रत्येकी 3-3 शतकं लगावली आहेत. (Photo Credit : Shikhar Dhawan X Account)

पाकिस्तानचा सईद अनवर, श्रीलंकेचा उपुल थरंगा, इंग्लंडचा मार्कस ट्रेस्कोथिक आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन या चौघांनी प्रत्येकी 2-2 शतकं झळकावली आहेत. (Photo Credit : Icc X Account)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकमेव शतक लगावलं आहे. रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 26 व्या स्थानी आहे. (Photo Credit : Rohit Sharma X Account)

तर विराट कोहली याला अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीत एकही शतक करता आलेलं नाही. मात्र विराटने 5 अर्धशतकं केली आहेत. (Photo Credit : Virat Kohli X Account)