आजपासून या बँकेची ATM सेंटर्स बंद, ग्राहकांना पैसे कसे मिळणार?

Bank ATM | तुम्ही तुमच्या सूर्योदय बँकेच्या एटीएम / डेबिट कार्डचा वापर तुमच्या इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरू ठेवू शकता, असे बँकेने ग्राहकांना दिलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे. 30 जूनपर्यंत, सूर्योदय एसएफबीकडे एकूण 555 बँकिंग आउटलेट होते, त्यापैकी 97 लायबिलिटी फोकस आउटलेट होते आणि 30 जून रोजी एकूण कर्मचारी संख्या 5,072 होती.

| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 6:44 AM
1 / 5
सूर्योदय स्मॉल फायनान्शियल बँकेने नुकतीच आपल्या ग्राहकांसाठी सूचना जाहीर केली होती. त्यानुसार बँकेकडून आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून आपली ऑटोमेटेड टेलर मशीन्स (ATM) बंद करण्यात आली आहेत.. बँकेने यासंदर्भात त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली होती.

2 / 5
आजपासून सूर्योदय स्मॉल फायनान्शियल बँकेची एटीएम सेवा बंद होणार आहे. ऑपरेशनल कारणांमुळे, सूर्योदय बँकेचे एटीएम 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद राहतील, असं सांगण्यात आलं आहे.

3 / 5
आजपासून या बँकेची ATM सेंटर्स बंद, ग्राहकांना पैसे कसे मिळणार?

4 / 5
एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले? मग चिंता करु नका, या टिप्स फॉलो करा

5 / 5
आमच्या बँकेच्या एटीएम केंद्रांचा ग्राहकांकडून म्हणावा तसा वापर होताना दिसत नव्हता. त्यामुळे एटीएम केंद्रे सुरु ठेवणे फारसे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे आम्ही बँकेची एटीएम केंद्रे बंद करुन त्याऐवजी ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएम केंद्रांवर मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर.भास्कर बाबू यांनी सांगितले. अलीकडच्या काळात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने रोख पैसे काढण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे बँकेने एटीएम केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे आर.भास्कर बाबू यांनी म्हटले.