थंडीत मुलांना खायला द्या ही ड्रायफ्रुट्स, अनेक समस्या होतील दूर

| Updated on: Jan 04, 2023 | 5:42 PM

1 / 6
हिवाळ्याच्या दिवसांत सुका मेवा किंवा ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे फायदेशीर ठरते. त्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. तसेच हेल्दी फॅट्स, अँटी-ऑक्सीडेंट्स आणि फायबरही असते. हिवाळ्यात मुलांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना ड्रायफ्रुट्स जरूर खायला द्यावेत. मुलांना ड्रायफ्रुट्स खायला देण्याने त्यांची इम्युनिटी वाढते. तसेच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास चांगला होतो.

2 / 6
काजू : मुलांसाठी काजू खूप आरोग्यदायी ठरतात. लहान मुलांना हे खूप चविष्ट वाटू शकतात. काजूमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, जे मुलांच्या डोळ्यांचे संरक्षण करू शकते. याव्यतिरिक्त, काजूमध्ये उच्च पातळीचे मॅग्नेशिअम देखील असते, जे हाडांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरते. जर तुम्हाला तुमच्या मुलांची हाडे मजबूत हवी असतील तर त्यांना काजू खायला द्यावेत.

3 / 6
पिस्ता : हिवाळ्यात मुलांना दररोज पिस्ता खायला द्यावा. पिस्त्यामध्ये ए, सी, ई, थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, पायरीडॉक्सिन आणि फोलेट यांसारखी आवश्यक जीवनसत्वे असतात.  या सर्व पोषक घटकांच्या मदतीने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यांता मानसिक विकासही चांगला होतो.

4 / 6
अक्रोड  : अक्रोड हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत आहे, जे तुमच्या मुलाच्या मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. यासोबतच अक्रोडमध्ये कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि झिंक ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

5 / 6
खजूर  : हिवाळ्यात मुलांना उत्साही ठेवण्यासाठी त्यांना खजूर खायला द्या. खजूरामध्ये ऊर्जा मुबलक प्रमाणात असते. यासोबतच कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि झिंक यांसारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.  खजुरामध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते, ज्यामुळे मुलांना ॲनिमियाचा त्रास होत नाही व लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते.

6 / 6
बदाम : मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी त्यांना बदाम खायला द्या. बदामामध्ये भरपूर फॉस्फरस असते, जे हाडे आणि दात दोन्ही मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच बदामामध्ये भरपूर फायबर असते, जे मुलांसाठी उत्तम स्नॅक असते.