
आपण सगळेच घाम गाळतो, पण काही लोकांच्या घामाला खूप वास येतो ! काही लोकांना शरीराच्या दुर्गंधीमुळे त्रास होतो. आंघोळ केल्यानंतर आणि परफ्यूम लावल्यानंतर हा वास काही काळ नाहीसा होऊ शकतो पण ते कायमस्वरुपी उपयोगी ठरत नाही. पण काही पदार्थ आपल्या शरीरातील वास दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

संत्र, मोसंबं, लिंबू, द्राक्षे इत्यादी लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे तुमच्या शरीरात वास निर्माण करणार्या बॅक्टेरियाची वाढ कमी होते.

दिवसाची सुरुवात फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनाने करा. ओट्स आणि संपूर्ण धान्य पचायला सोपे आहे. यासोबतच ते शरीराचे तापमान राखण्यासही मदत करतात.

जेवणाची चव वाढवणाऱ्या वेलचीचा छान सुगंध तुम्हाला परिचित असेलच. हे केवळ श्वासाच्या दुर्गंधीशी लढत नाही तर शरीराच्या दुर्गंधीशी देखील लढते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे, वेलची ही शरीराचा गंध संतुलित करते.

लेट्युस, ओवा, पालक आणि केल यासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर क्लोरोफिल असते, जे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देतात. परंतु हे गंध निर्माण करणारे कंपाऊड्सचा प्रभाव कमी करण्यासाठी देखील ओळखले जाते.