Photo : हे ठिकाण होतं इंग्रजांचं सर्वात आवडतं हिल स्टेशन, भारतीयांना पाय ठेवायलाही नव्हती परवानगी!

Tourist Place : भारतात अनेक हिल स्टेशन आहेत. मात्र आज आपण अशा एका ठिकाणाची माहिती जाणून घेणार आहोत, जे इंग्रजांच्या आवडीचे ठिकाण होते. या ठिकाणी भारतीयांनी प्रवेश मिळत नव्हता.

बापू गायकवाड | Updated on: Feb 21, 2026 | 9:43 PM
1 / 5
मसुरी : उत्तराखंडमधील मसुरी हे भारतातील एक प्राचीन आणि अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे, ज्याला 'पहाडांची राणी' (Queen of Hills) म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे.

मसुरी : उत्तराखंडमधील मसुरी हे भारतातील एक प्राचीन आणि अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन आहे, ज्याला 'पहाडांची राणी' (Queen of Hills) म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे.

2 / 5

ऐतिहासिक पार्श्वभूमी: मसुरी शहराची स्थापना ब्रिटिशांनी 1823 मध्ये केली होती. 1820 मध्ये त्यांनी येथे जमीन खरेदी करून हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण (हिल स्टेशन) म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली.

3 / 5

भारतीयांवर बंदी: ब्रिटीश राजवटीत मसुरीमध्ये भारतीय लोकांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी होती. विशेषतः मॉल रोडवर 'इंडियन्स अँड डॉग्स नॉट अलाउड' (Indians and Dogs not allowed) अशी पाटी लावण्यात आली होती.

4 / 5

प्रमुख आकर्षणे: मसुरीमध्ये केम्प्टी फॉल्स, गन हिल, मुसोरी लेक, लाल टिब्बा आणि कॅमल्स बॅक रोड ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. एप्रिल ते जून हा काळ या ठिकाणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.

5 / 5

प्रवास आणि नियोजन: मसुरीला जाण्यासाठी देहरादून हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे तिथून सुमारे 35 किमी अंतरावर आहे. पर्यटकांनी प्रवासाचे नियोजन करताना हवामान आणि मुक्कामाची चौकशी करून या ठिकाणी जावे असा सल्ला दिला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us