
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारसदार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार आणि स्टार महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात टीव्ही 9 मराठीचे इनपुट हेड मोहन देशमुख यांचा स्टार महाराष्ट्र पुरस्काराने गौरव करण्यात आला. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, स्वयंपूर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार राम कदम, आमदार अशोक पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी आपटे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, महाराष्ट्र टाईम्स चे पत्रकार सौरभ शर्मा, नवभारत चे वरिष्ठ पत्रकार अखिलेश कुमार मिश्रा, दैनिक सकाळचे मुंबईचे ब्युरो चीफ विनोद राऊत, नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद डोईफोडे, पत्रकार प्रशांत बढे, पत्रकार रुपाली बडवे, पुण्य नगरीचे मुंबई संपादक विशाल राजे, दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे, दैनिक लोकनायकचे बुद्धभूषण गोटे, संपादक संतोष कोठावदे, पत्रकार सुशांत पाटील, लोकसत्ताचे अशोक अडसूळ, भगवान परब, राजू झनके, ॲड.स्मिता चिपळूणकर, लॉर्ड बुद्ध टीव्ही चे संपादक सचिन मून यांचाही गौरव करण्यात आला.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार, तसेच एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक हे मान्यवरही उपस्थित आहे.