कबरीतून बाहेर काढतात मृतांचे अवशेष, नवे कपडे घालून करतात सणासारखा सोहळा; कुठे आहे ही परंपरा?

एखाद्या घरात व्यक्तीचं निधनं झालं की तिच्या आठवणी जपल्या जातात. पण जगात असा एक देश आहे जिथे मृत व्यक्तीच्या कबरीतून तिचे अवशेष बाहेर काढले जातात. जाणून घ्या त्या देशाविषयी आणि त्याच्या जगावेगळ्या परंपरेविषयी

| Updated on: Oct 19, 2026 | 7:35 PM
1 / 6
एखाद्या घरात व्यक्तीचं निधनं झालं की तिच्या आठवणी जपल्या जातात. पण जगात असा एक देश आहे जिथे मृत व्यक्तीच्या कबरीतून तिचे अवशेष बाहेर काढले जातात. त्यांना नव्या कापडाच गुंडाळलं जातं आणि कुटुंबीय त्यांच्यासोबत उत्सव साजरा करतात.

एखाद्या घरात व्यक्तीचं निधनं झालं की तिच्या आठवणी जपल्या जातात. पण जगात असा एक देश आहे जिथे मृत व्यक्तीच्या कबरीतून तिचे अवशेष बाहेर काढले जातात. त्यांना नव्या कापडाच गुंडाळलं जातं आणि कुटुंबीय त्यांच्यासोबत उत्सव साजरा करतात.

2 / 6

कोणत्या देशात आहे ही अनोखी परंपरा? :आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजळ असलेल्या मादागास्कर या बेटावर 'फामादिहाना' नावाची परंपरा आढळते. या परंपरेला इंग्रजीमध्ये 'टर्निंग ऑफ द बोन्स' असंही म्हटलं जातं. या विधीमध्ये मृत पूर्वजांचे अवशेष कबरीतून बाहेर काढले जातात आणि कुटुंबीय त्यांच्याभोवती एकत्र येतात.

3 / 6

मृत व्यक्तीच्या अवशेष बाहेर का काढतात? : या परंपरेमागे आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. काही मालागासी समुदायामध्ये मृत व्यक्तींचा आपल्या कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही संपत नाही.अशी यामागची पारंपारिक धारणा आहे.

4 / 6

या विधीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मृत व्यक्तीचे अवशेष बाहेर काढल्यानंतर त्यांना नव्या कापडात गुडाळणं.काही कुटुंबामध्ये या कापडाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यानंतर पूर्वजांचं स्मरणं करून पारंपरिक विधी पार पडतात. ही परंपरा मृत व्यक्तीबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग मानली जाते.

5 / 6

या परंपरेत केवळ धार्मिक विधीच केले जात नाहीत, तर संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. नातेवाईक भेटतात. पारंपरिक संगीत वाजवलं जातं.नाच केला जातो आणि काही ठिकाणी सामूहिक जेवणही आयोजित केलं जातं.

6 / 6

काही कुटुंबामध्ये या विधीदरम्यान पूर्वजांशी मनातील गोष्टी बोलण्याची परंपरा आहे. कुटुंबातील घडामोडीत, नव्या पिढीतील सदस्य आणि आयुष्यातील महत्त्वाच्या घटना यांची माहिती पूर्वजांना सांगितली जाते.अशी काही ठिकाणी प्रथा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us