TV to Film Struggle : तू एक उत्कृष्ट अभिनेत्री, अनुराग कश्यपकडून अशनूर कौरचे कौतुक

अशनुर छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (You are an excellent actress, compliment Ashnoor Kaur from Anurag Kashyap)

VN | Updated on: Nov 01, 2020 | 5:00 PM
1 / 7
अभिनेत्री अशनूर कौरनं 2018 मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’या चित्रपटात काम केलं होतं. अशनूरच्या या चित्रपटातील अभिनयानं सगळ्यांच्या भूवया उंचावल्या .

अभिनेत्री अशनूर कौरनं 2018 मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’या चित्रपटात काम केलं होतं. अशनूरच्या या चित्रपटातील अभिनयानं सगळ्यांच्या भूवया उंचावल्या .

2 / 7

अशनुरनं छोट्या पडद्यावर अनेक भूमिका गाजवल्या. ती छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

3 / 7

आतापर्यंत अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांनी मोठा पडदाही गाजवला आहे. मात्र त्यामागे रात्र-दिवस मेहनत असते, हा रस्ता खडतर असतो. याविषयावर स्वत: अशनूर व्यक्त झाली आहे.

4 / 7

वयाच्या 5 व्या वर्षी अशनूरनं ‘झांसी की रानी’या मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल टाकलं.

5 / 7

छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावर काम मिळणं अवघड असतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये छोट्या पडद्यावरील कलाकारांसोबत भेदभाव केला जातो, असे अशनूर म्हणाली.

6 / 7

तिने ‘मनमर्जियां’ या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतरचा अनुराग कश्यपचा एक किस्साही शेअर केला आहे. मी जेव्हा मनमर्जियां चित्रपटाचे शूटींग करत होते तेव्हा अनुराग कश्यप यांनी माझ्यासोबत अतिशय चांगली वागणूक दिली.

7 / 7

या चित्रपटाचे शूटींग संपतेवेळी अनुराग कश्यप मला म्हणाले, तू तर मला चुकीचे ठरवलेस, टीव्हीवरील अभिनेत्री फार ओव्हर अॅक्टींग करतात असं मला वाटतं होते. पण तू तर एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, असे अनुराग अशनूरला म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us