ARMC Election 2022: प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे वर्चस्व, यंदा कॉंग्रेसचा होणार का सुपडा साफ?

| Updated on: Aug 06, 2022 | 1:52 PM

ज्याप्रमाणे अमरावती महापालिकेवर भाजपाचे वर्चस्व त्याचप्रमाणे या 12 प्रभागाची स्थिती आहे. चार वार्डापैकी तीन वार्डामध्ये भाजपाला विजय खेचून आणता आला होता तर एका जागेवर कॉंग्रेसच्या उमेदवाराला यश मिळाले होते. बदलत्या राजकीय समिकरणानुसार राज्यात भाजपाचे वजन वाढले आहे. त्याचा परिणाम आता होऊ घालत असलेल्या निवडणुकांवर तर होणारच आहे. कॉंग्रेसच्या ताब्यातील तो एक वार्ड ताब्यात घेण्यावर भाजपाचे लक्ष राहणार आहे.

ARMC Election 2022: प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे वर्चस्व, यंदा कॉंग्रेसचा होणार का सुपडा साफ?
अमरावती महापालिका
Follow us on

अमरावती : प्रभाग क्रमांक 11 मध्ये (BJP) भाजापाच्या एकाही उमेदवाराला गत निवडणुकीत यश मिळाले नव्हते तर 12 मध्ये मात्र, चार पैकी तीन वार्डात भाजपा तर एका वार्डात कॉंग्रेसच्या उमेदवाराला यश मिळाले होते. यंदा महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्याच्या राजकारणात भूकंप झालेला आहे. गल्लीपासून दिल्ली पर्यंतची (Political Committees) राजकीय समिकरणे ही बदलली आहे. असे असतानाच आता महापालिकेच्या निवडणुका होत आहे. राज्यातील राजकारणाचा स्थानित पातळीवर परिणाम होणार असून अजून कोणत्याच पक्षाची भूमिका ही स्पष्ट झालेली नाही. भाजप, शिंदे गट एकत्र लढणार की महाविकास आघाडीचे काय होणार हे सर्व अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी भाजपाचे वर्चस्व असलेल्या (Amravati Municipal) अमरावती महापालिकेत काय बदल होणार की भाजपाची ताकद आणखी वाढणार हे पहावे लागणार आहे. महापालिकेतील नगरसेवकांची सदस्य संख्या 98 आहे. यात अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत. महापालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी 32 प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. यंदाच्या निवडणुकीत अधिकतर प्रभाग हे तीन वार्डाचेच राहणार आहेत.

प्रभागावर भाजपाचे वर्चस्व

ज्याप्रमाणे अमरावती महापालिकेवर भाजपाचे वर्चस्व त्याचप्रमाणे या 12 प्रभागाची स्थिती आहे. चार वार्डापैकी तीन वार्डामध्ये भाजपाला विजय खेचून आणता आला होता तर एका जागेवर कॉंग्रेसच्या उमेदवाराला यश मिळाले होते. बदलत्या राजकीय समिकरणानुसार राज्यात भाजपाचे वजन वाढले आहे. त्याचा परिणाम आता होऊ घालत असलेल्या निवडणुकांवर तर होणारच आहे. कॉंग्रेसच्या ताब्यातील तो एक वार्ड ताब्यात घेण्यावर भाजपाचे लक्ष राहणार आहे. या प्रभागातील ‘अ’ वार्डात राधा राजू कुरील, ‘ब’ मध्ये नुतन धनंजय बुजाडे, ‘क’ मध्ये जयश्री विजय डहाके या भाजपाच्या नगरसेवकांचा सहभाग होता. गेल्या पाच वर्षात येथील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीही बदललेली आहे. त्यामुळे भाजप फुलणार की कॉंग्रेस आपले अस्तित्व दाखवून देणार हे पहावे लागणार आहे.

महापालिकेचे असे आहे स्वरुप

अमरावती महापालिकेसाठी यंदा मतदान होऊ घालत आहे. अमरावतीची लोकसंख्या एकूण 6 लाख 47 हजार 057 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 11 हजार 435 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15 हजार 955 एवढी आहे. तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये 19 हजार 834 एवढी लोकसंख्या आहे. अनुसुचित जातीचे 6 हजार 717 तर अनुसूचित जमातीचे 1 हजार 102 एवढी लोकसंख्या आहे. त्यामुळे जातीय समिकरणाबरोबर सर्वसाधरण गटाचीही महत्वाची भूमिका राहणार आहे.

हा आहे महत्वाचा भाग

प्रभाग क्रमांक 12 ची व्याप्ती ही वडाळी परिसरात आहे. ही रचना 2017 निवडणुकीतील आहे. यंदा वार्ड फेररचना झाल्याने यामध्ये बदल होऊ शकतो. या प्रभागात अमरावती विद्यापीठ परिसर, राधाकृष्ण कॉलनी, एस,आर.पी.एफ परिसर, भगवान नगर, व्यंकटेश नगर, वडाली गाव, गगलानी गनर, पारधी कॉलनी, प्रबुध्द नगर, देवी नगर, वडरपूरा, पंचशील नगर, लुंबिनी नगर हा भाग होता. यंदाच्या बलत्या परस्थितीचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

आरक्षणावरही सर्वकाही अवलंबून

प्रभाग क्रमांक 12 मध्ये तीन नगरसेवक हे भाजपाचे तर एक हा कॉंग्रेसचा आहे. राजकीय वजनाबरोबर आरक्षणाचाही कळीचा मुद्दा ठरत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधाील ‘अ’ वार्ड हा अनुसूचित जातीमधील महिलेसाठी राखीव राहणार आहे तर ‘ब’ वार्ड हा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहेत तर ‘क’ हा सर्वसाधारण साठी खुला राहणार आहे. त्यामुळे यंदाचे चित्र काय राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमरावती महापालिका प्रभाग क्र 11 वार्ड ‘अ’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
बहुजन समाज पार्टी
इतर

अमरावती महापालिका प्रभाग क्र 11 वार्ड ‘ब’

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजपा
कॉंग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
बहुजन समाज पार्टी
इतर

अमरावती महापालिका प्रभाग क्र 11 वार्ड ‘क’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजपा
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
बहुजन समाज पार्टी
इतर