पार्टी विथ डिफरन्स ! भाजपचा नेता म्हणतो, तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयात लीटरभर दारु देतो !
नवी दिल्लीः देशातील अनेक राज्यांमध्ये एकिकडे दारूविक्रीवर बंदी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे आंध्रप्रदेशातील भाजप नेत्यानं विचित्रच वक्तव्य केलं आहे. भाजप नेते सोमू वीरराजू (Somu Virraju) यांनी भर सभेत जनतेला स्वस्त दारू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वि सोमू वीरराजू हे साधेसुधे नेते नसून ते आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. आता या पदावरील नेत्याच्या अशा […]

नवी दिल्लीः देशातील अनेक राज्यांमध्ये एकिकडे दारूविक्रीवर बंदी आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे आंध्रप्रदेशातील भाजप नेत्यानं विचित्रच वक्तव्य केलं आहे. भाजप नेते सोमू वीरराजू (Somu Virraju) यांनी भर सभेत जनतेला स्वस्त दारू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. वि सोमू वीरराजू हे साधेसुधे नेते नसून ते आंध्रप्रदेश भाजपचे अध्यक्ष आहेत. आता या पदावरील नेत्याच्या अशा प्रकारे वक्तव्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता एरवी पार्टी विथ डिफरन्स म्हणून मिरवणारा भारतीय जनता पक्ष याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेत्याचं नेमकं वक्तव्य काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मंगळवारी विजयवाडा येथे एक सभा घेतली. या सभेत भाषण करताना ते म्हणाले, सध्या तर चांगल्या दर्जाच्या एक क्वार्टर दारूच्या बाटलीची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्यात प्रत्येक व्यक्ती 12 हजार रुपये प्रति महिना दारूवर खर्च करते. सरकारकडून कोणत्या ना कोणत्या येजनेच्या स्वरुपात तो पैसा परत केला जातो. राज्यातील समजा 1 कोटी लोक दारू सेवन करत असतील तर 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक कोटी मते द्या. आम्ही फक्त 70 रुपयांत एक लीटर दारू उपलब्ध करून देऊ. यातूनही आणखी महसूल वाचला तर आम्ही फक्त 50 रुपयात दारू उपलब्ध करून देऊ…”
सोमू वीरराजू यांनी या सभेत सध्याचे आंध्र प्रदेश सरकार जनतेला महागात दारू विक्री करत असल्याचा आरोप केला. मात्र भाजप स्वस्त दारू विकेल, या आश्वासनानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
इतर बातम्या-