“राज्यपालांचं शिवरायांबद्दलचं विधान निषेधार्ह, कोश्यारी महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोहीदेखील!”

| Updated on: Nov 19, 2022 | 3:16 PM

भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया...

राज्यपालांचं शिवरायांबद्दलचं विधान निषेधार्ह, कोश्यारी महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोहीदेखील!
Follow us on

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबतच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यांच्या या विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी महाराष्ट्र आणि शिवद्रोही असल्याचं म्हटलंय.

भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही देखील आहेत, असं संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एकदा गडकिल्ले फिरा म्हणजे तुम्हाला कळेल. उगाच उठायचं अणि जीभ टाळला लावायची हे धंदे बंद करा, असं संतोष शिंदे म्हणालेत.

कोश्यारींचं विधान

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

श्रीमंत कोकाटे यांची प्रतिक्रिया

इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनीही राज्यपालांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. माननीय राज्यपाल हे नेहमी संदर्भहिन बोलतात, वादग्रस्त बोलतात आणि अपमानजनक बोलतात. राज्यपालपदाची प्रतिष्ठा गमावलेले व्यक्ती म्हणजे कोश्यारी शरद पवार साहेब आणि नितीन गडकरी कर्तृत्ववान आहेत. ते आदर्श आहेतच पण राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उपमर्द केला. महाराज इतिहास वर्तमान आणि भविष्यकाळाला देखील प्रेरणा देणारे महापुरुष आहेत. ते कायम सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत, असं श्रीमंत कोकाटे म्हणालेत.