‘बाबर का बच्चा-बच्चा जय श्रीराम बोलेगा…’, भाजपा नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Apr 24, 2024 | 11:24 AM

भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निवडणूक काळात अनेकदा अशी वादग्रस्त वक्तव्य होत असतात. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर वादग्रस्त वक्तव्यांचा जणू पूरच आलाय, असं वाटू लागलय.

बाबर का बच्चा-बच्चा जय श्रीराम बोलेगा…, भाजपा नेत्याच वादग्रस्त वक्तव्य
C.P.Joshi
Follow us on

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा-जसा पुढे जातोय, त्यात रंगत येत चाललीय. शाब्दीक हल्ले सुद्धा वाढू लागले आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर वादग्रस्त वक्तव्यांचा जणू पूरच आलाय, असं वाटू लागलय. या यादीत राजस्थानच्या भाजपा अध्यक्षाच नाव सुद्धा जोडलं गेलय. देशात पुन्हा मोदीजींच सरकार आलं, तर येणाऱ्या काळात बाबरचा बच्चा-बच्चा जय श्रीराम बोलेलं. उदयपूरमध्ये एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना सीपी जोशी यांनी हे वक्तव्य केलं.

उदयपूर लोकसभा मतदारसंघातील भिंडर येथील प्रचारसभेत सीपी जोशी यांनी हे वक्तव्य केलं. “देशात मोदी सरकार पुन्हा आलं, तर येणाऱ्या काळात बाबरचा बच्चा-बच्चा जय श्रीराम बोलेलं” असं ते म्हणाले. “अबू धाबी सारख्या मुस्लिम देशात भगवान श्रीरामाचा झेंडा फडकतोय. मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मंदिराच्या पाठौत्सवला सुद्धा गेले होते. यावरुन हे दिसून येतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू फक्त देशातच नाही, संपूर्ण विश्वात आहे” असं सीपी जोशी म्हणाले.

‘असे विचार असणाऱ्यांना दफन करायचं आहे’

या निवडणूक प्रचारसभेला प्रदेश प्रभारी अरुण सिंह, मंत्री झावर सिंह खर्रा उपस्थित होते. आपल्या भाषणात प्रदेश अध्यक्ष सीपी जोशी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सनातनला शिव्या देतात. काँग्रेस पक्षाने प्रभू रामाच्या जन्मावर प्रश्न उपस्थित केला. त्यांना काल्पनिक म्हटलं. रामनवमी आणि नववर्षाला निघणाऱ्या शोभायात्रांमधील भगव्या ध्वजावर प्रतिबंध घातला. येत्या 26 तारखेला भाजपाला मतदान करुन असे विचार असणाऱ्यांना दफन करायचं आहे”

अकबराला महान ठरवणाऱ्यांना धडा शिकवण्याच आव्हान

“राम मंदिराबद्दल निर्णय आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर निर्माणसाठी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली. एककाळ तो सुद्धा होता, जेव्हा वादग्रस्त ढांचा पाडल्यानंतर तत्कालिन सरकारने सभागृहात ‘पवित्र बाबरी मस्जिद’ पाडल्याचा निंदा प्रस्ताव पास केला होता” अशा शब्दात सीपी जोशी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. अकबराला महान ठरवणाऱ्यांना धडा शिकवण्याच आव्हान सीपी जोशी यांनी केलं.