‘सेना’ नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची की अफजलखानाची, भाजपचा हल्लाबोल सुरु

| Updated on: Nov 21, 2019 | 6:56 PM

"महासेनाआघाडीतील सेना नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची की अफजलखानाची यावर अंतिम निर्णय काँग्रेस नेते अहमद पटेल घेतील," अशी टीका भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केली (BJP Avadhut Wagh criticized MahaSena Aaghadi) आहे. ‘

सेना नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची की अफजलखानाची, भाजपचा हल्लाबोल सुरु
Follow us on

मुंबई : “महासेनाआघाडीतील सेना नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची की अफजलखानाची यावर अंतिम निर्णय काँग्रेस नेते अहमद पटेल घेतील,” अशी टीका भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केली (BJP Avadhut Wagh criticized MahaSena Aaghadi) आहे. ‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या माध्यमांनी ठेवलेल्या नावाला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याचं म्हटलं जातं (Avadhut Wagh criticized MahaSena Aaghadi) आहे. यावर आता भाजपनेही टीका केली (BJP Avadhut Wagh criticized MahaSena Aaghadi) आहे.

“काँग्रेसने विरोध केल्यामुळे महाशिवआघाडी मधील शिव हटविण्यास शिवसेनेने समंती दिली आहे. त्यामुळे ही आघाडी आता महासेनाआघाडी म्हणून ओळखली जाईल. अर्थात यातील सेना नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची की अफजलखानाची यावर अहमद पटेल अंतिम निर्णय घेतील – सूत्र.” असे भाजप नेते आणि प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटलं (BJP Avadhut Wagh criticized MahaSena Aaghadi) आहे.

राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगाने घडताना दिसत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र तीन पक्षांच्या आघाडीला दिलेल्या नावावरुन नाराजी असल्याची चर्चा आहे. ‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या माध्यमांनी ठेवलेल्या नावाला काँग्रेसचा आक्षेप आहे. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याची माहिती (Congress Objects MahaSena Aaghadi Name) आहे.

‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या नावातून केवळ शिवसेना या एकाच पक्षाचं नाव अधोरेखित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही. सर्वच पक्षांच्या नावांचा समावेश करण्याचा आग्रह धरण्याऐवजी कोणाचंच नाव समाविष्ट करु नये. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या जोडगोळीला ‘आघाडी’, तर शिवसेना-भाजपच्या एकत्रिकरणाला ‘युती’ संबोधलं जात असे. हळूहळू त्यात घटकपक्षांचा समावेश झाल्यानंतर ‘आघाडी’ची ‘महाआघाडी’ झाली, तर ‘युती’ची महायुती. शिवसेनेने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत ‘आघाडी’च्या गोटात एन्ट्री केली. ही आघाडी अद्याप चर्चेच्या पातळीवर असली, तरी प्रसारमाध्यमांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे नामकरण केलं आहे. ‘महासेनाआघाडी’, ‘सेना महाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ अशी विविध नावं या आघाडीला मिळाली. त्यामुळे नेते आणि सोशल मीडियावरही ही नावं प्रसिद्ध झाली.

दरम्यान मुंबईत तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे. डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेलं दिसेल. एक डिसेंबरच्या आधी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असंही संजय राऊत (Congress Objects MahaSena Aaghadi Name) म्हणाले आहेत.