मोठी बातमी! दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?; ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

| Updated on: Sep 18, 2022 | 9:50 AM

शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) मोठी बातमी समोर येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ (Cabinet) विस्तार लवकच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Follow us on

मुंबई :  शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) मोठी बातमी समोर येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ (Cabinet) विस्तार लवकच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसऱ्या विस्तारात कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गट तसेच भाजपमधील (BJP) जे नेते नाराज झाले हेते त्यांना यावेळी मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे अद्यापही पालकमंत्रीपदाचे वाटप झाले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.