नितेश राणेंना कणकवलीत येण्यास बंदी, तिथं काही काळ शांतता नांदेल, दीपक केसरकर यांची खोचक टीका

| Updated on: Feb 10, 2022 | 6:53 AM

शिवसेना नेते (Shivsena) आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांना संतोष परब हल्लाप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

नितेश राणेंना कणकवलीत येण्यास बंदी, तिथं काही काळ शांतता नांदेल, दीपक केसरकर यांची खोचक टीका
दीपक केसरकर, शिवसेना नेते
Follow us on

सिंधुदुर्ग: शिवसेना नेते (Shivsena) आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांना संतोष परब हल्लाप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. नितेश राणे यांना कणकवलीत येण्यास बंदी घातल्यानं काही काळ शांतता लाभेल, अशी खोचक टीका दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. नितेश राणे यांच्या छातीत दुखतंय, त्यांना उलट्या होत आहेत. या परिस्थिती त्यांच्या प्रकृतीला आराम पडो, अशी प्रार्थना करतो. नितेश राणे यांच्या दुसऱ्या समर्थकांचा जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळलेला आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. याशिवाय नितेश राणे यांची प्रकृती बरी नसताना फटाके वाजवणं योग्य नाही, असं देखील केसरकर म्हणाले आहेत. नितेश राणे यांना काल जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना कोल्हापूरमधील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथून त्यांना कधी डिस्चार्ज मिळणार हे पाहावं लागणार आहे.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

नितेश राणेंना कणकवलीत बंदी केल्यामुळे काही काळ तरी कणकवली शांतता नांदेल असा उपरोधिक टोला शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी लगावला आहे.नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर केसरकर यांनी सावंतवाडी मध्ये पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते म्हणाले की,आपला नेता आजारी असताना कार्यकर्त्यांनी फटाके लावणे हे कितपत योग्य आहे.यावेळी त्यांनी नितेश राणेंना सुधारण्याचा सल्ला ही दिला आहे.

पाहा व्हिडीओ:

नितेश राणे यांनी आतातरी सुधारावं

शिक्षा झालेले कैदी आपल्या छातीत दुखतं असं म्हणायला लागले तर वेगळा सेक्शनच सरकारने तयार करावा असं दीपक केसरकर म्हणाले. नितेश राणेंना यापूर्वी दोनवेळा शिक्षा झालेली आहे त्यामुळे ते आता सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

नितेश राणे यांना जामीन, अटींचं पालन करावं लागणार

नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहेत. तसेच साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये, असेही कोर्टाने ठणकावले आहे.

नितेश राणे यांना या अटींचं पालन करावं लागणार

1) 30 हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आलीय.
2) दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यामध्ये प्रवेशबंदी.
3) तपास आधिकारी तपासाला बोलवतील त्यावेळी चौकशीसाठी हजर राहणे.
4) कणकवली तालुक्याबाहेर ज्या ठिकाणी वास्तव्य करणार त्या ठिकाणचा पत्ता देणे.
5) दर सोमवारी 10 ते 12 या वेळेत ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे.

इतर बातम्या:

Nitesh Rane : जामीन मिळूनही नितेश राणेंची आजची रात्र रुग्णालयातच, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Nitesh Rane : नितेश राणेंची अँजिओग्राफी टेस्ट करणार, राणेंना नेमकं झालंय काय?

Deepak Kesarkar slam Nitesh Rane after got bail in Santosh Parab Attack case