“काही लोक आपल्या दुर्भाग्याला आपलं कर्तृत्व मानतात अन् 13 आमदारांवर एका आमदारावर येतात”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरे यांना टोला

| Updated on: Jun 30, 2022 | 4:14 PM

Dipali Sayyad : हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है? -दिपाली सय्यद

काही लोक आपल्या दुर्भाग्याला आपलं कर्तृत्व मानतात अन् 13 आमदारांवर एका आमदारावर येतात, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरे यांना टोला
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपण पदत्याग करत असल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं. त्यानंतर विविध प्रतिक्रिया यायला लागल्या. महाविकास आघाडीचा भाग असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांना असं पायउतार व्हावं लागणं, दुख:द असल्याचं म्हटलं. पण उद्धव ठाकरे यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत आपली तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही लोक आपल्या दुर्भाग्याला आपलं कर्तृत्व मानतात अन् मग ते 13 आमदारांवरून एका आमदारावर येतात.त्यानंतर ते सौभाग्याचा अर्थ इतरांना शिकवतात. हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है?, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

दिपाली सय्यद यांचं ट्विट

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना सवाल विचारणारं ट्विट केलं आहे. “काही लोक आपल्या दुर्भाग्याला आपलं कर्तृत्व मानतात अन् मग ते 13 आमदारांवरून एका आमदारावर येतात.त्यानंतर ते सौभाग्याचा अर्थ इतरांना शिकवतात. हमारे झमेलेमे तुम्हारा क्या काम है?, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांचं ट्विट

राज ठाकरे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर एक ट्विट केलं. नाव जरी घेतलं जात नसलं तरी सध्या घडणाऱ्या घडामोडी पाहता हे ट्विट उद्धव ठाकरे यांनाच उद्देशून लिहिलंय हे सांगायला कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!”, असं ट्विट त्यांनी केलं आहे. हिंदीमधूनही राज ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. हिंदीमधून राज ठाकरे यांनी याबाबतची मूळ पोस्ट केली आहे. ‘जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना निजी कर्तृत्व मानने लगता है उस दिन से पतन का प्रवास शुरु होता है’ अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.