ED Arrested Sanjay Raut Live : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, कोर्टात ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

| Updated on: Aug 01, 2022 | 4:28 PM

आज दुपारी राऊतांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर कोर्टानं संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी (ED Custody) सुनावली आहे.

ED Arrested Sanjay Raut Live : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, कोर्टात ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद काय?
संजय राऊत
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीच्या पथकानं काल संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला. साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी (ED Officers) संजय राऊतांना ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर आज दुपारी राऊतांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर कोर्टानं संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी (ED Custody) सुनावली आहे.

ईडीच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

ईडीच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. त्यात त्यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले.

  1. प्रवीण राऊत हे फक्त फ्रंटमॅन होते, घोटाळा संजय राऊत यांनी केला
  2. प्रवीण राऊतांच्या कंपनीतून 1 कोटी संजय राऊतांच्या खात्यात
  3. 50 कोटींमधून 1 कोटी 6 लाख राऊतांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात
  4. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात हे पैसे गेले
  5. 2010 – 11 मध्ये राऊत दर महिन्याला 2 लाख प्रवीण राऊतांकडून घ्यायचे
  6. संजय राऊतांच्या पैशातून अलिबागमध्ये 10 जमिनी खरेदी करण्यात आल्या
  7. प्रवीण राऊतांच्या कंपनीनं 37 लाख दादरच्या घरासाठी दिले
  8. प्रकल्पातील 112 कोटींपैकी 50 कोटी प्रवीण राऊतांना मिळाले
  9. संजय राऊतांच्या विदेश दौऱ्यासाठी प्रवीण राऊतांचे पैसे
  10. ईडीकडून संजय राऊतांच्या 8 दिवसाच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली.

संजयचा मला अभिमान – उद्धव ठाकरे

संजय राऊतांबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. संजय माझा जुना मित्र आहे. मी त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. गुन्हा काय संजयचा. पत्रकार आहे. शिवसैनिक आहे. निर्भिड आहे. जे पटत नाही ते बोलतोय. मरण आलं तरी शरण जाणार नाही. हे त्याचं वाक्य चांगलं आहे. तोही शरण जाऊ शकला असता. जे शरण झाले हमाममध्ये गेले आंघोळीला गेले. जोपर्यंत सत्तेचा फेस अंगावर आहे तोपर्यंत गेलेले आमच्यावर टीका करू शकतात. फेस गेल्यावर परिस्थितीची जाणीव होईल. त्यानतंर फेस उतरला तर ते काय आहेत हे लोकांसमोर येईल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची पाठराखण केली. तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर जोरदार हल्ला चढवलाय.