Bhavana Gawali : आधी निकटवर्तीयाला अटक, आता शिवसेना खासदार भावना गवळी यांनाही ED ची नोटीस

| Updated on: Sep 29, 2021 | 11:10 AM

शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती.

Bhavana Gawali : आधी निकटवर्तीयाला अटक, आता शिवसेना खासदार भावना गवळी यांनाही ED ची नोटीस
Bhavana Gawali
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना अंमलबजावणी संचलनालय (ED) अर्थात ईडीने समन्स पाठवलं आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान (Saeed Khan) याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा भावना गवळी यांच्याकडे वळवला आहे. खासदार गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भावना गवळी यांच्यावर नेमके आरोप काय?

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

सईद खानला 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी

मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. . त्यांना ईडी कोर्टात हजर केलं असता 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

सईद खान यांच्यावर नेमका आरोप काय?

खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना सत्र न्यायालयाने दिली 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत ईडी कस्टडी दिली आहे. सईद खानला परवा रात्री ईडीने अटक केली होती. एनजीओचं व्यावसायिक कंपनीत रुपांतर केल्याचा आरोप खान यांच्यावर आहे. आज आरोपीला सत्र न्यायलयाच्या विशेष कोर्टात करण्यात आलं होतं. सईद खान यांच्या अटकेमुळं भावना गवळी यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे पाच नेते ईडीच्या रडारवर 

शिवसेनेचे पाच  बडे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं दिसतंय. परिवहन मंत्री अनिल परब हे 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीच्या निशाण्यावर आहेत. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या अफरातफरीचे आहेत. दुसरीकडे यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी या सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत.

याशिवाय शिवसेना आमदार  प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अकडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना डिसेंबर 2020 मध्ये सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने नोटीस पाठवण्यात आली होती. 55 लाखाच्या व्यवहाराप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली होती.

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर आहेत. भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

शिवसेनेचे ‘पंचरत्न’ ईडीच्या रडारवर, 5 बडे नेते अडचणीत, कोणावर कोणता आरोप?

भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी

Bhavana Gawali | ईडीच्या निशाण्यावर असलेल्या खासदार भावना गवळी यांची राजकीय कारकीर्द