भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती.

भावना गवळींचे निकटवर्तीय सईद खान यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला,  1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी
ED
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:03 PM

मुंबई : शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती. आज ईडी कोर्टात हजर केलं असता सईद खानला 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणात भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती.

सईद खान यांच्यावर नेमका आरोप काय?

खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान याला सत्र न्यायालयाने दिली 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत ईडी कस्टडी दिली आहे. सईद खानला काल रात्री ईडीने अटक केली होती. एनजीओच व्यावसायिक कंपनीत रुपांतर केल्याचा आरोप खान यांच्यावर आहे. आज आरोपीला सत्र न्यायलयाच्या विशेष कोर्टात करण्यात आलं होतं. सईद खान यांच्या अटकेमुळं भावना गवळी यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भावना गवळी यांच्यावर नेमके आरोप काय?

भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.

भावना अ‌ॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.

भावना गवळींचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

महाविकासआघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढण्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रकरणात भावना गवळी यांच्यावर आरोप केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विदर्भातील रस्तेबांधणीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे काही नेते अडथळे आणत असल्याचे म्हटले होते. यावरुन किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांना प्रत्युत्तर देताना भावना गवळी यांनी म्हटले होते की, किरीट सोमय्या यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. मात्र, त्यांनी माझ्यासमोर येऊन कोणता भ्रष्टाचार झाला आहे, हे सांगावे. तेव्हा मी त्यांना उत्तर देईन, असे भावना गवळी यांनी म्हटले होते.

इतर बातम्या:

शिवसेनेचे ‘पंचरत्न’ ईडीच्या रडारवर, 5 बडे नेते अडचणीत, कोणावर कोणता आरोप?

शिवसेनेचे 3 मोठे नेते ईडीच्या कचाट्यात, भावना गवळींच्या निकटवर्तीयाला अटक

Maharashtra Shivsena MP Bhavana Gawali close aide Saeed Khan sent to ed custody till 1 october

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.