एकनाथ खडसेंच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल, राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज

| Updated on: Oct 21, 2020 | 1:31 PM

"नाथाभाऊ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल," अशी भावना एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. (Eknath Khadse resigns BJP Many Activist at Bunglow)

एकनाथ खडसेंच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल, राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज
Follow us on

मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. यानंतर नाथाभाऊंच्या समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची त्यांच्या बंगल्यावर रेलचेल सुरु झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता असून राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज झाल्याचं ही पाहायला मिळत आहे. “नाथाभाऊ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” अशी भावना एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. (Eknath Khadse resigns BJP Many Activist at Bunglow)

याबाबत टीव्ही 9 मराठीने थेट एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर जात कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. “नाथाभाऊंचा अद्याप निर्णय आलेला नाही. ते जो काही निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना मान्य असेल. आतापर्यंत काहीही माहिती आलेली नाही,” असे मत त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

“नाथाभाऊ जो काही निर्णय घेतील तो योग्यच घेतील. नाथाभाऊंवर सातत्याने जो अन्याय झालेला आहे, तो बहुजन समाजाला मान्य नव्हता. त्यामुळे बहुजन समाजाने त्या अन्यायविरोधात त्याची चीड होती. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र २० टक्के भाजप आणि ८० टक्के नाथाभाऊ हे यंदा दाखवून देऊ. अजून काही निर्णय आलेला नाही. जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य आहे,” असेही एकनाथ खडसेंचे समर्थकांनी सांगितले.

“एकनाथ खडसे हे भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे मी यापूर्वीच सांगितले होते. याबाबत जळगाव महापालिका बरखास्त करावी अशाप्रकारे एक पत्र खडसेंच्या समर्थकांनी दिले होते. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे एकनाथ खडसे जाणार हे स्पष्ट झाले आहे,” असे मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केले.

“खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दल अनेक विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या परतीचे दोर कापले गेले होते. आता राष्ट्रवादीत गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल जे काही टीकास्त्र सोडतील त्याचा फायदा निश्चितच होतील. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी होईल. गिरीश महाजन आणि खडसे हे एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांना याचा फटका बसणार आहे. तर ओबीसी आणि इतरांना काहीही स्थान नाही असं म्हटलं जात होतं. मात्र खडसेंच्या प्रवेशामुळे तो मुद्दा मिटेल.”

“खडसेंच्या बाहेर पडण्यामुळे पकंजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे नाराज आहेत. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. आज २१ ऑक्टोबर आहे. यादिवशी विधानसभेचे मतदान झालं होतं. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे अनेक नातेवाईक बाहेर पडत होते आणि त्यावर शरद पवार संतप्त होत होते, असा तो काळ होता. आणि आता भाजपमधील नेता राष्ट्रवादीत येत आहे,” असेही संजय आवटेंनी सांगितले. (Eknath Khadse resigns BJP Many Activist at Bunglow)

संबंधित बातम्या : 

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’