मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये, नगरपरिषद इमारतीचं लोकार्पण, कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त

| Updated on: Oct 29, 2022 | 1:36 PM

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये आलेत...

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये, नगरपरिषद इमारतीचं लोकार्पण, कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त
Follow us on

नंदुरबार : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये आलेत. हेलिकॉप्टरने प्रवास करत ते नंदुरबारमध्ये (Nandurbar) दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे हे नेते उपस्थित होते. नगरपरिषदेच्या इमारतीचं लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे नंदुरबारमध्ये पोहोचले.

नंदुरबार नगरपरिषदेच्या इमारतीचं लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी शिंदे नंदुरबारमध्ये दाखल झाले.

ढोल ताशाच्या आणि फटाक्याच्या आतिषबाजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नंदुरबारमध्ये स्वागत करण्यात आलं.

ही इमारत उभी करण्यासाठी 22 कोटी रुपये खर्च आला. या इमारतीचं आज लोकार्पण झालं.

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषद इमारतीच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी नंदुरबार नगरपरिषदेच्या इमारती बाहेर रस्त्याच्या दुतर्फा लोकांची एकच गर्दी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शेकडोच्या संख्येने लोक कार्यक्रमस्थळी पोहोचले. लोक मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी यावेळी गर्दी झाली होती.

नगराध्यक्ष आणि नगरसेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औक्षण करत स्वागत केलं. नगरपरिषदेच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जमलेल्या लोकांना संबोधित केलं. 2019 लाच हे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत यायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे काही दिवसांआधी आम्ही हा निर्णय घेतला, असं शिंदे म्हणालेत.

आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. एनडीआरएफच्या निकषां पलीकडे जात आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत तीन महिन्याच्या आत आम्ही केली. 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना आम्ही मदत केली. रखडलेली विकास कामं तीन महिन्यात मार्गी लावली, असं शिंदे म्हणाले.

आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही सर्वांना कामाला लावलं. सरकारमध्ये असलेल्या आणि नसलेल्या बाकी लोकांना देखील आम्ही कामाला लावलं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.