Shiv Sangram Vinayak Mete Passed Away : मित्रपक्षांचा सच्चा यार, विरोधकांचा दिलदार दोस्त! विनायक मेटेंच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला…

| Updated on: Aug 14, 2022 | 9:20 AM

shiv sangram Vinayak mete passed away: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shiv Sangram Vinayak Mete Passed Away  : मित्रपक्षांचा सच्चा यार, विरोधकांचा दिलदार दोस्त! विनायक मेटेंच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला...
Follow us on

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईला पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून आदरांजली व्यक्त केली जात आहे. विनायक मेटे यांचं वय अवघं 52 वर्षांचं. त्यामुळे हे वय जाण्याचं नव्हे, अश्या भावना राज्यभरातून व्यक्त होत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, संभाजीराजे छत्रपती, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, दीपक केसरकर, भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेत्यांनी मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मराठा समाजाचं न भरून निघणारं नुकसान- संभाजीराजे

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणालेत. ‘एक मोठा शॉक आहे. मराठा समाजासाठी परखडपणे आपली बाजू ते मांडत आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी विधानभवनात आपली बाजू मांडली. मराठा समाजावरील अन्याय सरकारनं दूर करावा, याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळेल. आजची बातमी ऐकूण मोठा शॉक बसला. वेळोवेळी त्यांनी मला अनेकदा फोन केले होते. कशा पद्धतीनं आपण एकत्र येऊ शकतो, यावर देखील अनेकदा संवाद साधला. छत्रपती घराण्याविषयी त्यांना नेहमी आदर होता, अशी भावना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

माझा जवळचा मित्र गमावला- तावडे

खूपच धक्का बसणारी बातमी आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्याने मराठा समाजाच्या मागण्या कशा मार्गी लावायच्या याबाबत दिल्लीमध्ये बैठकही झाली. विनायक मेटे हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. आम्ही सोबत काम केले असून त्यांची समाजासाठी एक वेगळीच तळमळ नेहमीच बघायला मिळायची. मात्र, अशा पध्दतीने ते अचानक जातील असे कधीच वाटले नव्हते. आजही ते मराठा समन्वय समितीची बैठकीसाठी मुंबईकडे येताना त्यांचा अपघात झालायं. खरोखरच आजचे दु:ख हे शब्दामध्ये सांगण्यासारखे नाहीयं.

“विनायक मेटेंच्या (Vinayak Mete) अपघाताबद्दल मलाही चॅनल मार्फतच कळलं. मराठा समाज समितीचा अध्यक्ष असताना माझी आणि त्यांची जवळीक निर्माण झाली होती. अतिशय अभ्यासू नेता होता. त्यांचं जाणं अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक आहे.” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीये.