BMC election 2022 : मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर, प्रभाग 141 मधील राजकीय समीकरणं काय, वाचा…

| Updated on: Aug 17, 2022 | 3:11 PM

प्रभाग क्रमांक 141 मधील राजकीय समीकरणं जाणून घेऊयात...

BMC election 2022 : मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर, प्रभाग 141 मधील राजकीय समीकरणं काय, वाचा...
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशावेळी काही दिवसांआधीच मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय.राज्यात सत्तांतर झालंय शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलंय. अश्यात महापालिकेत विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस आक्रमक भूमिका घेतलीय. आता राजकीय गणितं बदलली आहेत. उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांशी सलगी केलीय. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडलीय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेत. अश्यात आता महापालिका निवडणुका (BMC election 2022) लागणार आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणांसकट या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होणार यात काही शंका नाही. अश्यात आता प्रभाग 141 मध्ये काय स्थिती आहे, 2017 ला कोण विजयी झालं, याचा आढावा घेऊयात…

व्याप्ती

हा प्रभाग शास्त्रीनगर, बैगनवाडी, गोवंडी या भागात आहे. अहिल्यादेवी होळकर मार्ग, इदगाह मैदान, बाजीप्रभू देशपांडे मार्ग, करबाला दर्गा नाला, रामदेव मौर्या मार्ग, घाटकोपर-मानखूर्द लिंक रोड उक्त रोड या भागात प्रभाग 141 पसरलेला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेअंतर्गत 4 मे 2022 रोजी आदेशानुसार निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केलंय. महापालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासंदर्भात कार्यक्रम दिला होता. त्याला अनुसरुन मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

प्रभाग 141 मधील 2017 ची मतदान आकडेवारी

काँग्रेस विठ्ठल लोकरे 3642

समाजवादी नदीम दुर्रानी 2337

राष्ट्रवादी साजिद खान 2135

भाजप दिनेश पांचाळ 2658

अपक्ष मधुकर रास्ते 70

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष