शिवसेनेसोबत राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याही हरला! महाजनांच्या पीएसोबत लावलेली 1 लाखाची पैज चर्चेत

| Updated on: Jun 11, 2022 | 11:24 AM

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : देशमुखांनी दिलेलं हे आव्हान कोण स्वीकारणार? अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली होती.

शिवसेनेसोबत राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याही हरला! महाजनांच्या पीएसोबत लावलेली 1 लाखाची पैज चर्चेत
गिरीश महाजनांच्या पीएचं ओपन चॅलेंज
Image Credit source: TV9
Follow us on

जळगाव : राज्यसभेचा (Rajya Sabha) जागा सहा. उमेदवार सात. त्यामुळे कुणीतरी एक हरणार, हे नक्की होतंच. पण कोण जिंकणार आणि कोण कुणावर मात करणार, याची चर्चा कमालीची रंगली. पैजाही लागल्या. आता निकाल स्पष्ट झालेत. त्यामुळे कोण पैज हरलं आणि कोण जिंकलं, हे देखील स्पष्ट झालंय. जळगावात लागलेल्या या पैजेची राज्यभर चर्चा रंगली होती. गिरीश महाजन यांच्या पीएने (Girish Mahajan PA Arvind Deshmukh) ओपन चॅलेंज दिलं होतं. फेसबुक पोस्ट (Facebook post) करत त्यांनी पैज लावण्याचं आवाहन केलं होतं. अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकली, अशी पैज लावली होती. आता हे आव्हान कोण स्वीकारणार, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता पुढे आला. त्यानंतर चॅलेंज स्वीकारलं आणि पैज लावली. पण ही पैज हरण्याची नामुष्की सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आली आहे. आता एक लाख रुपये या कार्यकर्त्याला गिरीश महाजनांच्या पीएला पैज हरल्यानं द्यावे लागणार आहेत.

चॅलेंज स्वीकारलं, पण…

भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होणारच, असा दावा गुरुवारी केली होता. फेसबुक पोस्ट करत त्यांनी पैज लावण्यासाठी ओपन चॅलेंज दिलेलं. देशमुख यांनी 1 लाखाची पैजही याखातर लावली आणि ती स्वीकारण्याचं आव्हानही दिलं. देशमुखांनी दिलेलं हे आव्हान कोण स्वीकारणार? अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली.

सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राहुल पाटील यांनेही ते स्वीकारलं. पण रात्री अखेर ही शर्यत राष्ट्रवादी कार्यकर्ता राहुल पाटील हरले. आता त्यांना एक लाख रुपये गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांना द्यावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

विजयानंतरची फेसबुक पोस्ट

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अरविंद देशमुख यांनी फेसबुक पोस्टही करत, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख बिग बॉस म्हणून केलाय. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की..

किती आले आणि किती गेले उडुन गेला धुरारा!! !! कधी संपला नाही आणि कधी संपणार ही नाही भाऊ तुमचा दरारा !! किंग मेकर BOSS

गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. या मतदानासाठी व्हिलचेअर , एम्ब्युलन्स मधून येत भाजप आमदारांनी जातीने मतदानासाठी हजेरी लावलेली. दरम्यान, शिवसेना आणि भाजप असा थेट सामना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होताना दिसला. यात कोल्हापूरमधून संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात सामना झाला. यात भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केलाय.

राज्यसभेच्या सहा जाणांचा निकाल, कुणाच्या वाट्याला किती जागा?

  1. भाजप – 3
  2. शिवसेना – 1
  3. काँग्रेस – 1
  4. राष्ट्रवादी काँग्रेस – 1