पवार कुटुंबाचा पहिला पराभव, पार्थ पवारांवर श्रीरंग बारणेंची दोन लाखांनी मात

| Updated on: May 23, 2019 | 4:03 PM

मावळ : पवार कुटुंबाला पार्थ पवार यांच्या रुपाने पहिला पराभव स्वीकारावा लागलाय. तब्बल दोन लाखांच्या फरकाने पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. अखेर ही आघाडी कायम राहिली आणि तब्बल दोन लाखांच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली होती. श्रीरंग बारणे यांनी […]

पवार कुटुंबाचा पहिला पराभव, पार्थ पवारांवर श्रीरंग बारणेंची दोन लाखांनी मात
Follow us on

मावळ : पवार कुटुंबाला पार्थ पवार यांच्या रुपाने पहिला पराभव स्वीकारावा लागलाय. तब्बल दोन लाखांच्या फरकाने पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाला. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. अखेर ही आघाडी कायम राहिली आणि तब्बल दोन लाखांच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली होती.

श्रीरंग बारणे यांनी 669185, पार्थ पवार यांनी 458720 मतं मिळवली होती. बारणेंनी तब्बल 210465 मतांनी विजय मिळवला. सुरुवातीपासूनच या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष होतं. कारण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. पार्थ पवार हे त्यांच्या प्रचाराच्या स्टाईलमुळे सतत चर्चेत होते.

महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडासाफ

महाराष्ट्रात काँग्रेसचा फक्त चंद्रपूरमध्ये विजय होत आहे. राज्यात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पराभवाच्या छायेत आहेत. त्यांच्याविरोधातील भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे.

संबंधित बातम्या

लोकसभा निकाल : तुमच्या मतदारसंघाचा निकाल इथे पाहा!