सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं, सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

| Updated on: Oct 25, 2021 | 8:25 AM

आमदार म्हणून निवडून आलेले आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशनचे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. तसेच मुंबईमध्ये महापौर भाजपचा बसणार असा विश्वास देखील सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय. 

सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं, सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात
Sudhir Mungantiwar
Follow us on

मुंबई : आमदार म्हणून निवडून आलेले आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशनचे भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. तसेच मुंबईमध्ये महापौर भाजपचा बसणार, असा विश्वास देखील सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.

“आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”, असं म्हणत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

“स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार सध्या सुरु आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की थांबले पाहिजे आता, राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे. स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. उद्या मध्यान्न भोजन मी बघितलं, विद्यार्थ्यांच्या आरोग्य उत्तम राहावं, उद्या तर हे नेते म्हणतील त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी त्यांना हर्बल वनस्पती सध्या शाळेतच द्या”, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप

क्रुज ड्रग्स प्रकरणात एनसीबी आणि समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा कार्यक्रम नवाब मलिक आणि संबंधितांनी बनवला आहे. त्या अनुषंगाने रोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप करत असताना आता केंद्र सरकारवर किंवा तपास यंत्रणाना दोषी ठरवण्यासाठी असा ओढूनताणून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातूनच आता ही व्हिडीओ क्लिप आली असावी, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या विरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओ क्लिपसंदर्भात दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिली. एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर ट्वीट करुन त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराने वागणे चुकीचे वाटते. व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. कोणी तरी व्हिडिओ क्लिपमध्ये ‘सत्यमेव जयते’ बोलत असेल व त्या आधारे अनुमान लावणे हे चुकीचे आहे. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखवण्यासाठी त्या गोष्टी क्रिएट केल्या जात नाहीत ना? असा संशयही दरेकर यांनी व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या :

‘सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये’ भातखळकरांचा राऊतांना टोला

‘खासदाराला साधा अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं’, गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला