ताई एवढ्याही मोठ्या नाहीत… मनसेच्या ‘या’ नेत्याची सुप्रिया सुळेंवर आगपाखड

| Updated on: Sep 17, 2022 | 12:21 PM

प्रबोधनकार ठाकरे यांना के.सी. ठाकरे म्हणण्याएवढ्या सुप्रिया ताई मोठ्या झालेल्या नाहीत, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलंय.

Follow us on

मुंबईः प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांच्यावरील ट्विटचा वाद सध्या राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज एक ट्विट केलं आणि ते लगेच डिलीट केलं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं. यावेळी त्यांनी प्रबोधनकारांच्या नावाचा उल्लेख के.सी. ठाकरे असा केला. मात्र काही वेळातच सुप्रिया सुळे यांनी हे ट्विट डिलीट केलं. मात्र यावरून वाद उठलाय. प्रबोधनकार ठाकरे यांना के.सी. ठाकरे म्हणण्याएवढ्या सुप्रिया ताई मोठ्या झालेल्या नाहीत, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलंय. सुप्रिया सुळेंच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा रंगतेय. राजकीय वर्तुळातूनही यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Supriya Sule यांच्या टि्वटनंतर Sandeep Deshpande यांचा टोला-tv9