NMMC Election 2022 Ward 30 : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा अधिक चुरस पाहायला मिळणार, कुणाची होणार सरशी?

| Updated on: Aug 19, 2022 | 9:35 PM

नवी मुंबई महापालिकेत आरक्षण सोडत निघाल्यानंतर महापालिकेतील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत खल सुरु आहे.

NMMC Election 2022 Ward 30 : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा अधिक चुरस पाहायला मिळणार, कुणाची होणार सरशी?
Follow us on

नवी मुंबईकरांसाठी यंदाची महापालिका निवडणूक (Municipal Election) काहीशी वेगळी असणार आहे. कारण यंदा नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत आहे. यापूर्वी सलग 6 वेळा नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal Corporation) निवडणूक वार्ड पद्धतीनं झाली होती. एक वार्ड एक नगरसेवक अशी निवडणूक आतापर्यंत झाली होती. यावेळी नवी मुंबईकरांना एका प्रभागातून तीन नगरसेवक (Corporators) निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक वेगळी ठरणार आहे. नवी मुंबई महापालिकेत आरक्षण सोडत निघाल्यानंतर महापालिकेतील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. काही जणांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं आता कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवता येईल किंवा आपल्या प्रभागात कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत खल सुरु आहे.

आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 30 मधील वार्ड क्र – 30 (अ) मागासवर्ड प्रवर्ग (महिला), वार्ड क्र – 30 (ब) सर्वसाधारण आणि वार्ड क्र – 30 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

प्रभाक क्र – 30 मधून कुणाला संधी? कोण बाजी मारणार?

2017 च्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक 30 मधून शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर यांनी बाजी मारली होती. द्वारकानाथ भोईर हे शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुखही आहेत. आता प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्यानं प्रभाग क्रमांक 30 मध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे भोईर यांना पुन्हा संधी मिळाली तर त्यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार? तसंच अन्य वार्डात कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रभाग क्र 30 कुठून कुठपर्यंत?

प्रभागाची व्याप्ती : सानपाडा कारशेड, सेक्टर- 12, सेक्टर- 2, सेक्टर-7, सेक्टर-8, सेक्टर-9, सेक्टर 10 (भाग), सेक्टर-11, सेक्टर- 15, सेक्टर- 16, सेक्टर 16 ए, सेक्टर- 17, सेक्टर-18, सेक्टर 19, सेक्टर- 20, जुईनगर रेल्वे स्थानक, व इतर.

उत्तर : ठाणे खाडी हददीपासून पूर्वेस नाखवा सिताराम भगत चौक, (पामबीच मार्ग) तेथुन मोराज सर्कलपर्यंत (कस्तुरी सोसायटी- मोराज) व तेथुन पूर्वेस मोराज ब्रिज खालून शिव शंकर सोसायटी भुखंड क्र. 17, सेक्टर- 15, सानपाडा पर्यंत, पूर्वेस कारशेड रेल्वे ट्रॅक मार्गाने ओलांडून भुखंड क्र.13, सेक्टर-२ सानपाडा, येथून उत्तरेस वळसा घालून अंजली सोसायटी भुखंड क्र. 1, सेक्टर-1, पूर्वेस निळकंठ कॉर्नर भुखंड क्र. 2, सेक्टर-2, पुढे दक्षिणेकडे शिव पार्वती भूखंड क्र.9, सेक्टर-2, सानपाडा ते दक्षिणेस मोराज ब्रिजच्या खालून सह्याद्री सोसासटी भुखंड क्र. 50, सेक्टर-8, पूर्वेकडे सानपाडा पोलीस स्टेशन, सेक्टर-8 (संभाजी चौक) ते पॅराडाईज सोसासटी से. 7 पर्यंत, तेथून दक्षिणकेडे MTNL इमारत सेक्टर-10 पर्यंत, तेथून पूर्वेकडे अष्टविनायक सोसायटी भूखंड क्र. 28, सेक्टर-10 ते सायन-पनवेल महामार्गापर्यंत.

पूर्व : सायन- पनवेल महामार्ग जुईनगर रेल्वे स्टेशनच्या उत्तरेपासून ते दक्षिणेकडील जुईनगर नालापर्यंत (सायन- पनवेल महामार्ग)

दक्षिण : ठाणे खाडी पासून पूर्वेस सानपाडा STP समोरील नाल्याने उत्तरपूर्व दिशेस सानपाडा कारशेड रेल्वे लाईन ओलांडून व पूर्वेस नमुंमपा जलकुंभ से. ११ सानपाडा तेथून पूर्वेस समांतर नाल्याने रेल्वे मार्ग ओलांडून सायन-पनवेल महामार्गापर्यंत.

पश्चिम : ठाणे खाडी.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजप
शिवसेना
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर