MLA Marriage, Jitesh Antapurkar : नवरदेव आमदारानं लग्नाचे विधी सोडून गाठली मुंबई, कारण पक्षादेश, राज्यात सत्तानाट्य, देगलुरात आमदाराच्या लग्नाची चर्चा

| Updated on: Jun 30, 2022 | 9:00 AM

राजकीय परिस्थितीमुळे आणि सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे अंतापूरकर यांना स्वतःच्या लग्नाचे विधी सोडून मुंबई गाठावी लागलीय. आता त्यांचे लग्न ठरलेल्या वेळेत होते की नाही, याचीही मतदारसंघात चर्चा रंगलीय. लग्नघटीकेसाठी त्यांच्या भावी पत्नीलाही वाट पहावी लागण्याची चर्चा देखील अंतापूरकरांच्या मतदारसंघात आहे.

MLA Marriage, Jitesh Antapurkar :  नवरदेव आमदारानं लग्नाचे विधी सोडून गाठली मुंबई, कारण पक्षादेश, राज्यात सत्तानाट्य, देगलुरात आमदाराच्या लग्नाची चर्चा
आमदार जितेश अंतापूरकर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : राजकीय पक्षाच्या (Political Party) कार्यालयातून फोन आला की कधीही, केव्हाही आणि कुठेही असलेला कार्यकर्ता वेळेत हजर होतो. तुम्हाल पक्षनिष्ठेचे असे अनेक उदाहरण मिळतील. पण, पक्षासाठी एका आमदाराच्या भावी पत्नीवर वाट पाहण्याची वेळ आलीय. राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईत (Mumbai) बोलावलंय.  यामुळे हातातली आहे ती कामं सोडून आमदार मुंबईत गाठतायत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांचं येत्या 3 जुलैला लग्न आहे. पण, राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे आणि सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे अंतापूरकर यांना स्वतःच्या लग्नाचे विधी सोडून मुंबई गाठावी लागलीय. काँग्रेस पक्षाने आपल्या आमदाराला मुंबईला बोलावल्यानं अंतापूरकर यांनाही मुंबईला जावं लागलं. आता त्यांचे लग्न ठरलेल्या वेळेत होते की नाही, याची मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगलीय.

जितेश अंतापूरकरांच्या लग्नाची पत्रिका

राज्यातील सत्तासंघर्षाचा असाही परिणाम

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यामुळे सरकार अल्पमतात आलं. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बहुमत चाचणी तातडीनं करण्याचे आदेश दिले. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या सत्तासंघर्षादरम्यान, बहुमत चाचणी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळी महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीनं आपापले सर्व आमदार मुंबईत बोलावले आहेत. याच पक्षादेशानुसार नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले आमदार जितेश अंतापूरकर हे देखील मुंबईत आले. त्यांचं लग्न येत्या 3 जुलैला आहे. मात्र, राज्यातील सत्तास्थापनेची परिस्थिती बघता त्यांनीही मुंबईत गाठली होती.

हे सुद्धा वाचा

आमदार जितेश अंतापूरकर यांच्या साखरपुड्याचा फोटो

मतदारसंघात लग्नाची चर्चा

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले आमदार जितेश अंतापूरकर यांच्या मतदारसंघात त्यांच्या लग्नचाी चर्चा रंगली होती. आता सत्तासंघर्ष सुरू असताना अंतापूरकर यांचं 3 जुलैला लग्न आहे. त्यामुळे लग्न वेळेत लागणार का, अशीही चर्चा आहे. पक्षादेशाचा परिणाम अंतापूरकर यांच्या लग्नावर होण्याचं बोललं जातंय. यामुळे लग्नघटीकेसाठी त्यांच्या भावी पत्नीलाही वाट पहावी लागण्याची चर्चा अंतापूरकरांच्या मतदारसंघात आहे.

दरम्यान, राजकीय परिस्थितीमुळे आणि सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळे अंतापूरकर यांना स्वतःच्या लग्नाचे विधी सोडून मुंबई गाठावी लागलीय. आता त्यांचे लग्न ठरलेल्या वेळेत होते की नाही, याचीही मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगलीय.