Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार

Eknath Shinde vs Shiv sena Live, Maharashtra Politics, Maha new CM Updates : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, शपथविधी सोहळा

Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार
राजकीय घडामोडींच्या वेगवान अपडेट

|

Jul 03, 2022 | 12:04 AM

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यपालांना नवं मंत्रीमंडळ स्थापन करण्यासाठी पत्र देण्याची शक्यता आहे. गोव्यातून आज शिंदे गट मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पोलिस बंदोबस्त एकदम कडक ठेवण्यात आला आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगुंटीवार आणि भाजच्या अनेक नेत्यांनी पेठे वाटून आनंद साजरा केला आज सुध्दा राजकीय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता अधिक आहे.  काल रात्री मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर Maharashtra Government Formation LIVE Updates : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, समर्थकांची गर्दी, भाजपचे नेते विमानतळावरती दाखलआरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Jul 2022 11:01 PM (IST)

  विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार

  मुंबई- आजच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सध्या युतीकडे १७० पेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच या निवडणुकीत व्हीप लागू होत नसतो, तसेच या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदारही युतीच्या विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने असतील असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

 • 02 Jul 2022 10:58 PM (IST)

  शिंदे गट आणि भाजपा आमदारांची बैठक संपली

  शिंदे गट आणि भाजपा आमदारांची बैठक संपली. कायदेशीर बाजू भक्कम असल्याने उद्या सभागृहात लढली जाईल. असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. उद्याच्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड होणार आहे. ती व्यवस्थित होईल, असे राम कदम यांनी सांगितले आहे. सत्ताधाऱ्यांकडे 166 जणांचे संख्याबळ असल्याचा दावाही करण्यात आला आहे. कुठलीही नाराजी या बैठकीत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. 

 • 02 Jul 2022 10:52 PM (IST)

  राज्यातलं नवं सरकार शिवसेना आणि भाजपाचं-फडणवीस

  मुंबई- राज्यातील नवे सरकार हे शिवसेना आणि भाजपाचे आहे, असे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आणि भाजपा आमदारांच्या एकत्र बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 • 02 Jul 2022 10:25 PM (IST)

  ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये शिंदे समर्थक आमदारांची महत्त्वाची बैठक

  मुंबई- एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मुंबईत ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर, हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची बैठक पार पडते आहे. शिंदे आणि फडणवीस या आमदारांना संबोधित करीत आहेत.

 • 02 Jul 2022 09:54 PM (IST)

  एकनाथ शिंदे मूळ शिवसेनेवर दावा करू शकत नाहीत

  शिंदे यांना पक्ष विलीन करण्याशिवाय पर्याय नाही

  लोकसभा माजी सचिव PDT आचार्य यांची प्रतिक्रिया

  Live law चे संपादक मनू सेंबस्तीयन यांना दिलेल्या मुलाखतीत आचार्य यांची माहिती

  एकनाथ शिंदे यांना आपणच मूळ शिवसेना आहोत असा दावा करता येणार नाही - आचार्य

  शिंदे यांची याचिका ग्राह्य धरली जाऊ शकत नाही

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट काय निर्णय घेणार ??

 • 02 Jul 2022 08:50 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना गाडीतून उतरून अभिवादनही केलं

  मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना गाडीतून उतरून अभिवादनही केलं, त्यानंतर ते हॉटेलकडे रवाना झाले. गोव्यातून आलेले सर्व आमदार हे हॉटेलमध्येच राहणार आहेत.

  पाहा व्हिडिओ

 • 02 Jul 2022 08:48 PM (IST)

  आम्ही सहज बहुमत सिद्ध करू-मुख्यमंत्री

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई ते गोवा प्रवासातली प्रतिक्रियाही समोर आली आहे. त्यांनी बहुमत चाचणी सहज पार करून असा विश्वास व्यक्त केलाय.

  पाहा व्हिडिओ

 • 02 Jul 2022 08:36 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडले

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये जाताना बाहेर पडले. त्यांनी सर्वांना अभिवादन केलं आहे. कार्यकर्त्यांकडून ढोल, ताशे लावून स्वागतही करण्यात आलं आहे.

 • 02 Jul 2022 08:31 PM (IST)

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताजमध्ये दाखल

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताजमध्ये दाखल झाले आहेत. फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात राजकीय भूकंप घडवणारे आमदार अकेर मुंबईत दाखल झाले आहेत.

 • 02 Jul 2022 08:29 PM (IST)

  भाजप आमदार प्रसाद लाड हे आमदारांच्या स्वागताला विमानतळावर

  भाजप आमदार प्रसाद लाड हे आमदारांच्या स्वागताला विमानतळावर पोहोचले आहेत. त्यांनी आमदारांशी संवाद साधला आहे. आता विमानतळावरून ते हॉटेलवर जाणार आहेत.

 • 02 Jul 2022 08:24 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात...

  शिवसेना भाजप युतीचे राहुल नार्वेकर हे प्रचंड बहुमताने विजयी होतील. उद्या,, परवाचा दोन दिवसांचा कार्यक्रम आहे. आता काय औपचारिकता उरली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 • 02 Jul 2022 08:15 PM (IST)

  छत्रपती संभाजीराजे आज एकनाथ शिंदे यांना भेटणार

  मुंबई- छत्रपती संभाजी महाराज आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षणसह समाजातील विविध प्रश्नांसाठी हे भेट होणार आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याआधीच घेतली आहे.

 • 02 Jul 2022 08:07 PM (IST)

  शिंदे गटाचे आमदार थांबलेल्या हॉटेलमधून तिघांना अटक

  शिंदे गटाचे आमदार हे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबले होते. याच हॉटेलमधून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांकडे खोटी ओळखपत्रं आढळून आल्याने ही कारवाई केली आहे.

 • 02 Jul 2022 07:45 PM (IST)

  भाजप आमदारही आज हॉटेल मुक्कामी असणार

  मुंबई- हॉटेल प्रेसिडेंटमधील बैठक संपल्यावर भाजप आमदार ओबेरॉय हॉटेलमध्ये मुक्कामी राहणार आहेत. ओबेरॉय आणि ट्रायडेंट हॉटेल बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

  फडणवीसांकडे दोन खाती राहणार?

 • 02 Jul 2022 07:35 PM (IST)

  मुंबईत हॉटेल ताजबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

  मुंबईत ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांना ठेवण्यात येणार आहे, त्या हॉटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यात आलीय.

  आमदारांच्या विमानातला व्हिडिओही पाहा

 • 02 Jul 2022 07:29 PM (IST)

  काही वेळात आमदारांचं विमान हे मुंबईत दाखल होणार

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार काही वेळातच राजधानी मुंबईत दाखल होतील. मुंबई विमनतळावर आमदारांना घेण्यासाठी बसेस दाखल झाल्यात आहेत.

 • 02 Jul 2022 07:16 PM (IST)

  पक्षानं दिलेला व्हीप पाळावाच लागतो-शरद पवार

  पक्षाने दिलेला व्हीप हा पाळावाच लगतो. पक्ष म्हणजे दोन तीन भाग असतात. एक म्हणजे विधीमंडळाचा भाग आणि दुसरा पक्ष...याचा निर्णय हा कोर्टात होईल. शेवटी सभागृहाचे अध्यक्ष हा त्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे सभागृह अध्यक्षांची भूमिका ही महत्वाची राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

 • 02 Jul 2022 07:00 PM (IST)

  भाजप आणि शिंदे गटाची आज संयुक्त बैठक

  मुंबईत आल्यावर शिंदे गटाच्या आमदारांची आणि भाजप नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत.

  शिंदे गटाच्या आमदारांसाठी स्पेशल कॉरिडोअर

 • 02 Jul 2022 06:35 PM (IST)

  आमदार गोव्याहून निघाले, मुंबईत तयारी जय्यत

  बंडखोर आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गोव्याहून मुंबईकडे येत आहेत. या आमदारांसाठी मुंबईतही जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईत विमानतळाला सध्या पोलीस बंदोबस्ताने छावणीचं स्वरुप आलं आहे. तसेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरवरही बंदोबस्त लावण्यात आला आहे. आमदारांसाठी याठिकाणी विशेष कॉरिडोर तयार करण्यात आलाय.

  मुख्यमंत्र्यांची गोवा विमानतळावरील प्रतिक्रियाही पाहा

 • 02 Jul 2022 06:23 PM (IST)

  अण्णा हजारे आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ कॉल

  अण्णा हजारे आणि एकनाथ शिंदे यांची व्हिडिओ कॉलवरून चर्चा झाली आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्याकडे नव्या सरकारला आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे.

 • 02 Jul 2022 06:06 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

  या आमदारांना मुंबईत आणायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोव्यात गेले होते. तर शिवसेनेने जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांंचं संख्याबळ आहे, उद्या आम्ही बहुमत सिद्ध करणार आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोवा विमानतळावरून निघताना दिली आहे.

 • 02 Jul 2022 05:58 PM (IST)

  काही वेळात शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल होणार

  एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार हे मुंबईकडे काही वेळापूर्वीच रवाना झाले आहे. सुरूवातील गुजरात, त्यानंतर आसाम, त्यानंतर गोवा असा प्रवास करून हे आमदार मुंबईत परतत आहेत.

 • 02 Jul 2022 05:28 PM (IST)

  शिंदे गटाचे आमदार गोवा विमानतळावर दाखल

  एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोवा विमानतळावर दाखल झाले आहेत. ते काही तासात आता मुंबईत पोहोचणार आहेत. बंड केल्यानंतर पहिल्यांदाच हे आमदार मुंबईत येत आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे.

 • 02 Jul 2022 04:48 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोलीस सलामी पथकाची रंगीत तालीम

  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील घडामोडींना वेग आला आहे . सकाळपासूनच पोलीस प्रशासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन सुरक्षेचा आढावा घेत होते . आज ठाणे पोलिसांमार्फत सलामी पथक देखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून सलामी परेडची रंगीत तालीम सुरू आहे .

 • 02 Jul 2022 04:44 PM (IST)

  शिंदे गटाचे आमदार मुंबईकडे रवाना

  एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यातून मुंबईकडे रावाना झाले आहेत. बंडखोरी केल्यापासून पहिल्यांदाच हे आमदार मुंबईत येत आहे. मुंबईतही त्यांना कडेकोड सुरक्षेत ठेवण्यात येणार आहेत.

 • 02 Jul 2022 04:40 PM (IST)

  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक

  जयंत पाटलांनी बोलावली बैठक

  10 वाजता राष्ट्रवादी आमदारांना एकत्र केलं जाणार

  बैठकीत आमदारांना दिल्या जाणार सूचना

  बैठकीतचं आमदारांना व्हीप बजावला जाणार

  पक्षाचे प्रतोद अनिल पाटील बजावणार व्हीप

  उद्या सकाळी विधानभवनात हजर राहण्याचे आदेश

  सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

 • 02 Jul 2022 04:32 PM (IST)

  सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

  मंत्रिमंडळ शपथविधीची तारीख अद्याप ठरली नाही. 18 जुलैपूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, अधिवेशन 18 जुलैपासून असणार आहे.

  - अमरावतीची घटना चिंताजनक आहे. NIA ने चौकशी केल्या नंतर सत्य बाहेर येईल.

  - मागच्या सरकारनं या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर ते अधिक चिंताजनक आहे.

  - मतासाठी लाचारी, खुर्चीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर या गोष्टी झाल्यात की नाही हे चौकशीअंती बाहेर येईल.

 • 02 Jul 2022 04:30 PM (IST)

  शिंदे गटाचे आमदार 4.30 च्या सुमारास गोव्यातील ताज हॉटेल मधून बाहेर पडणार

  आमदारांच्या बस मधूनच एकनाथ शिंदे विमानतळा पर्यंत जाण्याची शक्यता

  पोलीस बंदोबस्तात आमदारांना विमानतळापर्यंत नेल जाणार

  बंडखोर आमदार तब्बल 11 दिवसा नंतर मुंबईत परतणार

  ताज हॉटेल बाहेरील हालचाली वाढल्या

 • 02 Jul 2022 04:29 PM (IST)

  भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिक्रिया

  - उद्याची विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आम्ही जिंकणार,

  - आमच्याकडे बहुमत असल्यामुळे राहुल नार्वेकर नक्कीच अध्यक्ष होणार,

  - देवेंद्र फडणवीस यांनी काल आमच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं, कुणाचीही नाराजी नाहीये,

  - मंत्रिपदाची अजून काही चर्चा नाही, सातारा जिल्ह्याला संधी देण्याचा देवेंद्र फडणवीस यासंदर्भात निर्णय घेतील.

 • 02 Jul 2022 04:18 PM (IST)

  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे Live

  आगामी निवडणूक ही चांगल्या जोमाने लढण्याबाबत आज चर्चा झाली आहे. सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केलं. मी मराठवाडा पाहतो. बंडखोरांचं लक्ष तिकडे असले तरी लोकांंचं मत हे उद्धव ठाकरेंच्या बाजुने आहे. अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. आम्ही सर्व प्रमुख मंडळी पक्ष मजबुतीने पुढे नेण्याासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहोत. कुणीही आमच्यातून फुटून जाणार नाही.

 • 02 Jul 2022 03:23 PM (IST)

  किरीट सोमय्या यांनी आरे मेट्रो कारशेडला दिली भेट

  आरे कारशेडला भेट देण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, आज आपण मुंबईच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या आरे कारशेडला भेट दिली आहे. मुंबईतील आरे येथे बांधण्यात येणारे मेट्रो कारशेड महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांचे सरकार येताच त्याच कामाला पुन्हा एकदा आरेमध्ये कारशेड बांधण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला. काही दिवसांत पुन्हा कामाला सुरुवात होणार असून, येत्या ७ महिन्यांत हे काम पूर्ण होईल, आणि पुन्हा 1 वर्ष मध्ये मुंबईची मेट्रो धावू लागेल, उध्दव ठाकरे सरकारने मेट्रोचे काम बंद केले होते, एवढेच नाही तर मेट्रोची सर्व लाईन बंद केली होती, मेट्रोचे सर्व काम ठप्प झाले होते, अशी प्रतिक्रिया यावेळी सोमय्या यांनी दिली आहे.

 • 02 Jul 2022 03:17 PM (IST)

  जळगावात बंडखोरांविरोधात शिवसेनेचा भव्य आक्रोश मोर्चा

  एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमंत्रित आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले, जळगावातही मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने या निषेधार्थ जळगावातील शिवसैनिक संतप्त झाले असून या पार्श्वभूमीवर जळगावात आज बंडखोरांच्या निषेधार्थ व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थ मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.

 • 02 Jul 2022 03:16 PM (IST)

  शिवसेना खासदार संजय राऊत LIVE

  काही लोक गेली आहे, पक्ष अजूनही जाग्यावर आहे. ठाण्यातूनही काही लोक उद्धव ठाकरे यांना भेटून गेले. आणखी काही बैठका या जिल्हा स्तरावर घ्यायचं ठरलेलं आहे. त्या आम्ही घेऊ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

 • 02 Jul 2022 03:02 PM (IST)

  आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

  विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना पक्षप्रतोद व्हीप बजावणार आहेत.  याची कायदेशीर लढाई कोर्टात सुरूच राहणार आहे. तसेच पक्षसंघटन अधिक मजबूत करणार आहोत. त्यासाठीच आजची बैठक होती, तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आक्रमक भूमिका घेणार असल्याची प्रतिक्रियाही सचिन अहिर यांनी दिली आहे.

 • 02 Jul 2022 02:59 PM (IST)

  गोव्याहून रात्री आमदार मुंबईत येणार

  गोव्याहून शिंदे गटाचे आमदार आज रात्री ८ वाजता मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तिथून त्यांना मुंबईतील ताज प्रेसिडेंसी हाॅटेलमध्ये नेण्यात येणार आहे. ऊद्या सकाळी आठ वाजता भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांसोबत महत्वाची बैठक होणार, यानंतर विधानभवनात यांना एकत्र नेण्यात येणार आहे. शिवसेनेकडून कोणतीही घटना घडू नये यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही अलर्ट मोडवर राहण्याचे पक्षाचे आदेशही आहेत.

 • 02 Jul 2022 02:15 PM (IST)

  शरद पवार लाईव्ह

  शरद पवार लाईव्ह

  गेल्या अनेक वर्षांपासून कुस्तीगीर परिषदेचे काम करत आहे - पवार

  खेळाच्या संघटनेत कधी राजकाणर आणत नाही - पवार

  खेळाच्या संघटनेत विविध पक्षाचे लोक असतात - पवार

  आम्ही सर्व एका विचाराने काम करतो

  कुस्तिगीर संघटनेत सुधारणा करण्यात  विलंब झाला.

  त्यात सुधारणा करता आली असती. पण केली नाही. पण यात राजकारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा याच्याशी काहीच संबंध नाही.

 • 02 Jul 2022 12:51 PM (IST)

  शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याच पाठवलेलं पत्र बेकायदशीर

  शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याच पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. त्यांनी ऐकलं नाही तर पुढील भूमिका घेऊ..सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचं आहे. त्यांच्या पक्षांला हे शोभणार नाही. ही कृत्य लोकशाहीला शोभादायक नाही.

  पक्षांकडून आता प्रतिज्ञापत्र घेतली जात आहेत. लोकांना प्रेमानं बांधव लागत. प्रेमाचं बंधन बाळासाहेबानी आम्हाला बांधलं. प्रतिज्ञापत्र देणं म्हणजे कार्यकर्त्यावर अविश्वास दाखवत आहात. नाती जपण्यासाठी गोडी आहे. किती तणाव याला मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे उत्तर आहे. आमची लढाई कर्तव्याची लढाई लढत आहोत. महाराष्ट्रात विकास झाल्यावरच आम्ही आनंदोत्सव साजरा करू.

  आमच्या बैठकीमध्ये राजकारणावर नाही तर विकासाच्या गोष्टीवर चर्चा होत असतात. देवेन्द्र फडणवीस मंत्रिमंडळात असणं म्हणजे मोठी ताकद मिळाली आहे. शिवसेना आणि भाजप ची मन जुळली पाहिजेत. भाजपपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी जवळची वाटत असेल तर भ्रम दूर होईल.

 • 02 Jul 2022 12:21 PM (IST)

  छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव / श्री करण पंढरीनाथ गायकर यांची निवड

  छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव / श्री करण पंढरीनाथ गायकर यांची निवड

  स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या अधिकृत प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव / श्री करण पंढरीनाथ गायकर यांची निवड करण्यात आली. विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी "स्वराज्य" संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.

  डॉ. धनंजय जाधव व / श्री करण पंढरीनाथ गायकर यांनी मराठा आरक्षण, अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. तसेच समाजातील वंचित व सोशिक घटकांसाठी ते गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

 • 02 Jul 2022 12:14 PM (IST)

  शिवसेना भवनमध्ये महत्वपूर्ण बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

  मुंबई- शिवसेना भवन मध्ये शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक

  दुपारी साडेबारा वाजता बैठक

  बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

  जिल्हा संपर्कप्रमुख यांची बैठक

 • 02 Jul 2022 12:12 PM (IST)

  भाजप आणि शिंदे गट आमदारांची संयुक्त बैठक होणार

  आज संध्याकाळी सात वाजता भाजप आणि शिंदे गट आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. ताज प्रेसिडेंट येथे सयुक्त बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 • 02 Jul 2022 11:59 AM (IST)

  गिरे तो भी टांग उपर अशी संजय राऊत यांची अवस्था, दरेकरांचा टोला

  गिरे तो भी टांग उपर अशी संजय राऊत यांची अवस्था, दरेकरांचा टोला

  कोविडच्या काळात चुकीचे केसेस तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी लावलेले होते. संजय पांडे हे सगळं सूडबुद्धीने कारवाई करत होते. गिरे तो भी टांग उपर अशी संजय राऊत यांची अवस्था आहे. त्यांना कोण विचारत नाही आत्ता. महाविकास आघाडी मध्ये तरी देखील समन्वय नाही आहे. किती काही झालं तरी आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे जिंकून येतील. संजय राऊत यांचा पहिलं शपथ पत्र घ्या. कारण ते शरद पवार यांच्या कुशीत जाऊन बसलेले आहेत. ते कधीही राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतील त्यानंतर शिवसैनिकांचे शपथपत्र घ्या.

 • 02 Jul 2022 11:54 AM (IST)

  पिंक रंगाचा व्हीप काढला जाणार, महाविकास आघाडीकडून एकच अर्ज भरणार - बाळासाहेब थोरात

  1. बाळासाहेब थोरात
  2. पिंक रंगाचा व्हीप काढला जाणार
  3. महाविकास आघाडी कडून एकच अर्ज भरणार
 • 02 Jul 2022 11:49 AM (IST)

  दिपाली सय्यद यांची शिवसैनिकांना भावनिक आवाहन

 • 02 Jul 2022 11:38 AM (IST)

  विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवींना महाविकास आघाडीकडून उमेदवारी

  विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवींना महाविकास आघाडीकडून उमेदवारी

  राजापूरचे ते आमदार आहेत, महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते आज विधानभवनात दाखल झाले आहेत

  बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे.

 • 02 Jul 2022 11:34 AM (IST)

  जळगावात आज बंडखोरांच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने भव्य आक्रोश मोर्चा

  जळगावात आज बंडखोरांच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने भव्य आक्रोश मोर्चा

  माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पाच बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा एल्गार

  आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  दुपारी दोन वाजता  शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून आक्रोश मोर्चाला होणार सुरुवात

  जळगाव जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर या आक्रोश मोर्चात एकही आमदार किंवा बडा नेता नाही

  केवळ जिल्हा संपर्कप्रमुख व शिवसैनिकांच्या नेतृत्वातच होणार हा आक्रोश मोर्चा

 • 02 Jul 2022 11:04 AM (IST)

  गजानन काळेंच्या ट्विटची चर्चा

 • 02 Jul 2022 11:03 AM (IST)

  विधानसभा अध्यक्षपदासाठी आज शिवसेना अर्ज दाखल करणार

  विधानसभा अध्यक्षपदासाठी आज शिवसेना अर्ज दाखल करणार

 • 02 Jul 2022 10:52 AM (IST)

  शिवसेनेतून कारवाई केलेल्या माजी महापौर नरेश यांनी चक्क उद्धव ठाकरे  यांचे फोटो बॅनर वर लावले

  1. शिवसेनेतून कारवाई केलेल्या माजी महापौर नरेश यांनी चक्क उद्धव ठाकरे  यांचे फोटो बॅनर वर लावले.
  2. गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा म्हणत आपलाच नरेश म्हस्के बॅनर वर उल्लेख..
  3. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे केले अभिनंदन
  4. तर बॅनर वर बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे,नरेंद्र मोदी,अमित शहा ,देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो
 • 02 Jul 2022 10:46 AM (IST)

  स्वराज्य संघटनेच्या प्रवक्ता पदी करण गायकर यांची निवड

 • 02 Jul 2022 10:45 AM (IST)

  शरद पवार भरणे यांच्या निवासस्थानी येणार

  माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भरणे यांच्या निवासस्थानी येणार आहेत.  भरणे यांच्या मोतोश्रींचे काल पहाटे झाले होते दिर्घ आजाराने निधन झाले.  गिरजाबाई विठ्ठल भरणे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी झाले निधन झाले आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे पवारांचे विश्वासू व अत्यंत जवळचे मानले जातात. आज 11:30 वाजता पवार साहेब इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील भरणे यांच्या निवासस्थानी घेणार भेट..

 • 01 Jul 2022 08:08 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

  कालच आमची बैठक झाली आहे. यात पीक पाण्याचा आवाहल यावरही चर्चा झाली आहे जनचेच्या हिताचे निर्णय घेण्यावर आमचा भर राहिल, कुणाचेही नुकासान आम्ही होऊ देणार नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र बनवण्यावर आमचा भर राहणार आहे.

 • 01 Jul 2022 08:06 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

  आपत्ती व्यवस्थानपनाची एक बैठक आयोजित केली होती. सर्व विभागातील अधिकारी या बैठकीला होते. कोणतेही जिवीत आणि मालमत्तेचे नुकासान होऊ नसे यासाठी काय तयारी करावी हे सांगितलेलं आहे. अनेक टीमही त्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांचं नुकसान होणार नाही. लोकांना सुरक्षित स्थळी पाठवणं, तसेच जेवणाची राहण्याची व्यस्था करण्याच्याही सूचना दिल्या आहे. कुणाचीही गैरसोई होणार नाही. याची काळजी घेतली आहे.

 • 01 Jul 2022 07:26 PM (IST)

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

  अपत्तीच्या वेळी काय उपयोजना केल्या जाव्यात याबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आहे. सर्व विभागातील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नोटीसा देऊन बिल्डिंग पडली तर बॉर्ड ऑफीसवर कारवाई करण्यात येईल.

 • 01 Jul 2022 06:18 PM (IST)

  विधानसभा अध्यपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होईल

  विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. माविआ सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आवाजी मतदान पद्धतीने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच या निवडीवेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ राहतील आणि त्यांच्या उपस्थितीत ही निवडूक पार पडेल.

 • 01 Jul 2022 06:12 PM (IST)

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

  मेट्रोचं बरेच काम झालं आहे. मात्र कारशेडचं काम झाल्याशिवाय मेट्रो सुरू होऊ शकत नाही. मागच्या सरकारने जागा बदलल्याने हे काम रखडलं आहे. आमच्या सरकारने सुरू केलेलं आरेतलं काम हे 25 टक्के पूर्ण झालं आहे. त्यामुळे मेट्रो लवकर सेवेत आणयची असेल तर मेट्रोचं कारशेड ही आरेमध्येच व्हावं, अशी आमची इच्छा आहे. मी उद्धव ठाकरे यांनाही इगो बाजुला ठेवण्याची विनंती केली, त्यांचा निर्णय हा चुकीचा होता, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

 • 01 Jul 2022 06:08 PM (IST)

  भाजपची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक

  भाजपच्या सर्व आमदराच्या बैठकीला साडे पाच वाजता ट्रायडेंट येथे सुरुवात होणार आहे. दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आणि विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील.

 • 01 Jul 2022 05:12 PM (IST)

  विवेक फणसाळकर यांची प्रतिक्रिया

  मुंबई समोर अनेक आव्हानं आहेत. ती सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्या अनुषगाने आज मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक आहे. या बैठकीसाठी सर्व विभागाना बोलावण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया विवेक फणसाळकर यांनी दिली आहे.

 • 01 Jul 2022 05:03 PM (IST)

  देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक

  ओबीसी आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले. प्रवीण दरेकर,डॉ. संजय कुटे,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

  फडणवीसांची ट्विटरवरून माहिती

 • 01 Jul 2022 05:00 PM (IST)

  देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा स्वीकारला पदभार

  देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी प्रविण दरेकर आणि भाजप आमदार उपस्थित होते. फडणवीस हे आज मंत्रालयात दाखल झाले आणि त्यांनी कामकाजही सुरू केलं आहे.
 • 01 Jul 2022 04:59 PM (IST)

  दुपारी बारा वाजल्यापासून संजय राऊत ईडी कार्यालयात

  दुपारी बारा वाजल्यापासून शिवसेना खासदार संंजय राऊत यांची ईडी चौकशी सुरू आहे. ईडीवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया ईडी चौकशीला जाताना संजय राऊतांनी दिली आहे.

 • 01 Jul 2022 04:51 PM (IST)

  नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे लागले भावनिक होर्डिंग

  प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार, तुझ्या पुढे आम्ही खुजे खुजे आहोत, तुला आमचा सलाम, अश्या आशयाचे लावण्यात होर्डिंग आले आहेत. देवेंद्र जी मुख्यमंत्री व्हावे ही आमची अपेक्षा होती, मात्र त्यांनी स्वतःच्या गळ्यातील माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात टाकली, त्यामुळे फडणवीस यांची यामुळे मोठी उंची वाढली, फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी महापौर संदीप जोशी यांनी असे होर्डिंग लावले आहेत.

 • 01 Jul 2022 04:43 PM (IST)

  मुख्य सचिवांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू

  देवेंद्र फडणवीस पुन्हा जोरदार एक्शन मोडमध्ये आले आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यापासून त्यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. आज मुख्य सचिवांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतरही काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

  फटाके फोडत कार्यकर्त्यांचा जल्लोष

 • 01 Jul 2022 04:01 PM (IST)

  राज ठाकरेंच्या फडणवीसांना शुभेच्छा

  श्री. देवेंद्र फडणवीस उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

  प्रिय देवेंद्रजी,

  सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो....

  तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

  आता जरा आपल्यासाठी

  ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

  एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

  पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

  आपला मित्र

  राज ठाकरे

 • 01 Jul 2022 03:34 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

  मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोवा येथील हॉटेलमधून मुंबईकडे रवाना, मुंबईत संध्याकाळी 5 वाजता आपत्ती व्यवस्थापन समितीची घेणार बैठक...

  जयंत पाटील यांचीही प्रतिक्रिया पाहा

 • 01 Jul 2022 03:33 PM (IST)

  शिंदे समर्थकाकडून ढोल ताशा वाजवत जल्लोष

  मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यानंतर आज देखील त्याच्या निवासस्थाना बाहेर शिंदे समर्थकाकडून ढोल ताशा वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी लाडू देखील वाटप करण्यात आले. शिंदे यांचे बंधू सुभाष शिंदे हे देखील या जल्लोषात सामील झाले होते.

 • 01 Jul 2022 03:20 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

  उद्या सर्व आमदार हे मुंबईत येतील. आरेबाबतचा निर्णय हा मी आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून घेऊ. जनतेचे प्रकल्प हे वेळेत पूर्ण झाले पाहिजेत यासाठी आमचं सरकार काम करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

  आशिष शेलार यांची शिवसेनेवर सडकून टीका

 • 01 Jul 2022 03:09 PM (IST)

  मंत्रिपदावरून शिंदे गटात रस्सीखेच सुरू

  नवं सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदे यांच्या गटात आता पुन्हा रस्सीखेच सुरू झाली आहे. मंत्रिपदावरून संजय शिरसाठ हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी ही संजय सिरसाठ यांची आहे.

  भाजपच्या जल्लोषाला फडणवीस अनुपस्थित

 • 01 Jul 2022 03:02 PM (IST)

  नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टिका

  बाळासाहेबांच्या पुत्रानं जे केलं नाही ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलंय सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवला. देवेंद्र फडणवीसांचा यामागे खूप मोठा त्यागा आहे. महाराष्ट्रावरचं संकट आता दूर झालंय. हनुमान चालीसा कोणी म्हणणार असेल तर आता राजद्रोह होणार नाही जेलमध्ये बसावं लागणार नाही. माझा कोणाशी वैयक्तिक संघर्ष नव्हता महाराष्ट्राशी हा संघर्ष होता, पण आता संकट दूर झालंय, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

  पाहा व्हिडिओ

 • 01 Jul 2022 02:52 PM (IST)

  काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे यांनी घेतली फडणवीसांची भेट

  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच अनेक नेते मंडळी ही त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहे.

 • 01 Jul 2022 02:45 PM (IST)

  वाटाघाटीच्या बैठका सुरू असल्याने फडणवीसांची अनुपस्थिती, भाजपचं स्पष्टीकरण

  सध्या सत्तेच्या वाटाघाटीच्या बैठका सुरू असल्याने फडणवीसांची अनुपस्थिती आहे. असे भाजपचं स्पष्टीकरण फडणवीसांच्या अनुपस्थितीबाबत समोर आलं आहे.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात मुंबईला रवाना होणार

 • 01 Jul 2022 02:37 PM (IST)

  भाजपच्या नेत्यांचा जल्लोष, फडणवीस मात्र अनुपस्थित

  मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. त्यांनी पार्टीच्या आदेशाचा मान ठेवला. अशी प्रतिक्रिया यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. अंतिम रांगेत बसलेल्या माणसाच्या आयुष्यात खुशी भरणं हाच आमच्या पार्टीचा संकल्प आहे. मात्र काही लोकांना मुंबई त्यांची पॉपर्टी वाटते, असे म्हणत त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावला आहे.

  मुंबई महापालिकेतही आपलीच सत्ता आली पाहिजे. पूर्ण शक्तिनिशी आपल्या प्रभागात काम करा. मुंबईत सत्ता परिवर्तन होईल.

 • 01 Jul 2022 02:36 PM (IST)

  नवनीत राणा व रवी राणा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले

  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कालच ते उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 • 01 Jul 2022 02:34 PM (IST)

  भाजप नेते किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया

  मी आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली भेट घेऊन त्यांच अभिनंदन केलं. ठाकरे सरकार आल्यावर पहिला निर्णय घेतला होता मेट्रो प्रकल्प बंद केले मात्र आता फडणवीस आणि शिंदे सत्तेत येताचं मेट्रो प्रकल्प पुन्हा सुरू करणार अशी घोषणा केली. संजय राऊतांना हे पाचवं समन्स आहे. पहिल्यांदा 72 लाख रुपये परत केले त्यात काय गडबड केली. तपासणी होऊन कारवाई होईल. संजय पाटकरांचंही नाव यामध्ये आहे त्यांच काय असं विचारताचं आधी यांच तरी होऊ द्या मग बघा अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पुढे नेतील.

 • 01 Jul 2022 02:14 PM (IST)

  अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता, तर हेच सरकार शानदारपणे आलं असतं.

  1. अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता, तर हेच सरकार शानदारपणे आलं असतं.
  2. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मुख्मयंत्र्यांची सही, मग पक्षप्रमुखांची सही, मग आमच्या कराराप्रमाणे हे पत्र फ्रेम करु मंत्रालयात लावा..म्हणजे सगळ्यांना कळलं असतं..
  3. माझं ऐकलं असतं, तर अडीचवर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता, आता तर पाचही वर्ष होणार नाहीये..
  4. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे. अनपेक्षित आल्यानंतर तो पद सोडताना क्वचितच लोक रडतात, तुमच्या डोळ्यात जे अश्रू आहेत, तीच माझी ताकद, त्याच्याशी प्रतारणा करणार नाही, गद्दारी करणार नाही
  5. विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र उतरवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा हा अट्टाहास त्यांनी केला.. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही... हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे..
 • 01 Jul 2022 02:10 PM (IST)

  माझा राग मुंबईवर काढू नका, मेट्रो कारशेडवर उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं विधान

  माझा राग मुंबईवर काढू नका मेट्रो कारशेडवर महत्त्वाचं विधान कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात अहंकार नाही माझा राग मुंबईवर काढू नका आरेचा आग्रह उगाच रेटू नका पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका

 • 01 Jul 2022 02:09 PM (IST)

  उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न....

  पहिला प्रश्न - ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं, कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच मी अमित शाहांना सांगत होतो, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री व्हावा, आताची जोडगोळी अशीच अडची वर्ष झाला असतो.. पहिल्या अडीच वर्षात याचा नाहीतर त्यांचा मुख्यमंत्री जाला. मग आता असं का केलं.. लोकसभा विधानसभेत एकत्र होतो. मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं... आता जे केलात ते तेव्हाच केलं असतं तर मविआ जन्मालाच आला नसता.. पाठीत वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.. पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल.. पण मुंबईच्या पाठीत वार खुपसू नका..

 • 01 Jul 2022 02:08 PM (IST)

  शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

  बऱ्याच दिवसांनंतर आपण असे फेस टू फेस भेटतोय. दोन अडीच वर्ष एफबी लाईव्हमधून संवाद साधला. तुम्हाला माझ्याकडून राजकीय प्रतिक्रिया हवी असेल. नवनिर्मित सरकारचं कालच अभिनंदन केलंय. सरकारकडून भलं व्हावं, असंही म्हटलंय. दोन तीन विषय मांडू इच्छितो.

 • 01 Jul 2022 01:47 PM (IST)

  किरीट सोमय्या सागर बंगल्यावर दाखल

  किरीट सोमय्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. ठाकरे पिता पुत्रांनी ज्या प्रकल्पाची वाट लावली तो प्रकल्प पुन्हा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर कारशेडवरून ठाकरेंवर टिका केली. महाराष्ट्र आता भ्रष्टाचारमुक्त होणार दिली अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 • 01 Jul 2022 01:37 PM (IST)

  आज ताज हॉटेलमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते कृषी दिन साजरा केला

  आज ताज हॉटेलमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते कृषी दिन साजरा केला

  आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची शपथ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली

  सातारा सारख्या भागातून आलेल्या मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या व्यथा माहिती आहेत

  केवळ कर्ज माफ करून काही होणार नाही तर त्यांना आधार दिला पाहिजे

 • 01 Jul 2022 01:33 PM (IST)

  उस्मानाबादचे धाराशिव नामकरण वाद पेटला, राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकारी यांचे सामूहिक राजीनामे

  उस्मानाबादचे धाराशिव नामकरण वाद पेटला, राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकारी यांचे सामूहिक राजीनामे

  उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज, जयंत पाटील यांना पत्र लिहून दिले राजीनामे

  नामांतरणला राष्ट्रवादीने विरोध केला नाही, शरद पवार यांना नेहमी साथ दिली मात्र नामांतरण मुस्लिम समाजाच्या जिव्हारी लागले

  अल्पसंख्यांक प्रदेश सचिव मसुद शेख, 5 नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी दिले सामूहिक राजीनामे

 • 01 Jul 2022 01:28 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होतं अचानक निर्णय आला - जयंत पाटील

  धक्का तंत्र आहे मला दिसत नाही. ज्या पद्धतीने सता मिळविण्यासाठी प्रयत्न केले ते पहिले. दोघाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. महाराष्ट्र मधील जनतेचा असलेल्या रोषावर हा बदल केला गेला. त्यांना सूचना आली मुख्यमंत्री पद मिळेल असाच वाटत होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होतं अचानक निर्णय आला. भाजपमध्ये आदेश झाला पाळावा लागतो. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री होण्यासाठी काही मिनिटं असताना असा निर्णय होण्याचे दुःख त्याच्या कडे आहे.

 • 01 Jul 2022 01:24 PM (IST)

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे दाखल

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे दाखल

  विवके फणसाळकर, रजनीश शेठ त्यानंतर आता आशुतोष डुंबरे सागरवर दाखल

  पोलीस विभागाच्या बैठकांचा सिलसिला कशासाठी ?.

 • 01 Jul 2022 01:19 PM (IST)

  उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार

  उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार

  पाय उतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये दिसत आहेत.

 • 01 Jul 2022 01:12 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदारांकडून सत्कार समारंभ !

  गोव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वसंतराव नाईकांना अभिवादन करण्यात आलं. कृषी दिनाच्या निमित्ताने आमदारांनी एकत्र येतं अभिवादन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आमदारांकडून सत्कार समारंभ !

 • 01 Jul 2022 01:02 PM (IST)

  आम्ही एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करायचं आहे - गिरीश महाजन

  1. विधानसभा अध्यक्षपदाबाबत सागरवर खलबतं
  2. मोठ्या नेत्यांमध्ये सागरवर चर्चा सुरू
  3. गिरीश महाजनही सागरवर दाखल
  4. विधानसभा अध्यक्षपदाचं आताचं नाही पण ते लवकरच जाहीर होईल
  5. आमच्याकडे 170 मतं आहेत आम्ही बहुमत चाचणी जिंकू
  6. आम्ही आनंदोत्सव साजरा कळणार.आहोत
  7. एक भ्रष्ट सरकार गाडून आमचं सरकार आलंय
  8. आता फक्त गंमत बघा आम्ही जिंकू

 • 01 Jul 2022 12:59 PM (IST)

  नाशिकमध्ये देवेंद्र फडवणीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, ढोल ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका

  - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पत घेतल्या नंतर नाशिकमध्ये भाजपचा एकच जल्लोष - भाजप मध्यवर्ती कार्यालय वसंत स्मृती येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत ,एकमेकांना पेढे भरून जल्लोष - मोठ्या संख्येने महिला ,पुरुष,युवा जल्लोषात सहभागी - फुगडी घालून महिला पदाधिकारी यांचा जल्लोष - भाजप आणि देवेंद्र फडवणीस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

 • 01 Jul 2022 12:58 PM (IST)

  राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ सागर बंगल्यावर दाखल,

  1. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ सागरवर दाखल
  2. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले
  3. काही वेळापुर्वी विवेक फणसाळकर यांनी घेतली होती भेट !

 • 01 Jul 2022 12:53 PM (IST)

  शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

 • 01 Jul 2022 12:52 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांचे मुक्ताईनगरात पंचवीस फुटाचे बॅनर

  मुक्ताईनगर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याच्या शुभेच्छा चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर कट आउट लावून बॅनरबाजी.......

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांचे मुक्ताईनगरात पंचवीस फुटाचे मोठमोठाले लागले शुभेच्छांचे कट आउट

  एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्या नंतर पहिल्यांदाच 3 वर्षानंतर

  मुक्ताईनगरात देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर, कट आउट झडकले

 • 01 Jul 2022 12:36 PM (IST)

  हे मुसलमानांच्या विरोधातलं षड्यंत्र आहे असं नाही - प्रकाश आंबेडकर

  सुप्रीम कोर्ट काही वेळेस चांगल्या उद्देशान निर्देश देतं. तसे त्यांनी नुपुर शर्मा यांना निर्देश दिलेत, की त्यांनी देशाची माफी मागावी. दुर्दैवानं त्यात एक गोष्ट राहिलीये.. आम्ही तेच म्हणतोय.. हे मुसलमानांच्या विरोधातलं षड्यंत्र आहे असं नाही.. तर आता हा जागतिक विषय झालाय.. जगाचं लक्ष आता याकडेल. वेगवेगळ्या धर्माचे प्रेषित आहेत, त्याचा तुम्ही आदर करता की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जे लोकं आदर करत नाही, त्यांवर तुम्ही काय काम करता, हे पाहणं महत्त्वाचंय.... आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय हानीकारक आहे..

  नुपूर शर्मा ने देशाची माफी मागावीः सर्वोच्च न्यायालय

  नुपूर शर्मा च्या वक्तव्याने देशातील जनतेच्या भावना भडकल्या. आज जे काय देशात होत आहे. यासाठी नुपूर शर्मा जबाबदार आहे. पोलिसांनी जे काही केलं त्या संदर्भात आमचं तोंड उघडू नकाः सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले.  त्यांनी सत्र न्यायालया समोर हजर व्हायला हवं. तिचे हे वक्तव्य तिचा धनंजय दाखवते. ती एका पक्षाची प्रवक्ता आहे म्हणजे त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार मिळतो का?

 • 01 Jul 2022 12:35 PM (IST)

  सुहास कांदे यांच्या एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या...

 • 01 Jul 2022 12:31 PM (IST)

  प्रकाश आंबेडकरांचा केंद्रासह आरएसएसवरती निशाना

  1. देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्यासाठी आरएसएस व केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उपमुख्मंत्रीपद दिलं आहे का हे विचारल पाहिजे - प्रकाश आंबेडकर
  2. फक्त फोलर टेस्टची परवानगी दिली आहे, सभागृहातील कामकाज चालवायची नाही
  3. शिवसेनेने सुप्रीम कोर्टात जाण्याऐवजी, महाविकास आघाडीने सर्व आमदार घेऊन राष्ट्रपतींसमोर ठिय्या धरावा
 • 01 Jul 2022 12:30 PM (IST)

  वेंगुर्लेत एकनाथ शिंदे यांचे वाळूशिल्प बनवून त्यांना शुभेच्छा

  महाराष्ट्राचे नूतन तिसावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सिंधुदुर्गातून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.वेंगुर्ले येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनीं वेंगुर्लेत एकनाथ शिंदे यांचे वाळूशिल्प बनवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.चिपकर यांच्या या अनोख्या शुभेच्छा सर्वांनाच भावल्या आहेत.

 • 01 Jul 2022 12:29 PM (IST)

  भाजप कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॅनरच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा

  एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती होऊन शपथ विधी पार पडल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे हे ठाण्यातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यास सुरुवात झाली असून भाजप कडून देखील एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत अभिनंदनाचे बॅनर झळकत आहे . एक सर्व सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा मजकूर या ठिकाणी दिसत आहे .या बॅनर मध्ये देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो वगळता बॅनर वर हिंदुहृदयसम्राट बाळासहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो बॅनर वर लावण्यात आला आहे.

 • 01 Jul 2022 12:27 PM (IST)

  बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्री बनवलं यापेक्षा काय - अशिष शेलार

  बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्री बनवलं यापेक्षा काय आहे. मला असं वाटतं आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करायला हवा. संजय राऊत यांनी केलेली वक्तव्ये...मास्टरस्ट्रोक जे मारतात त्यांना पुढचं चित्र स्पष्ट असतं. ज्या पद्धतीने हा प्रवास हा महाराष्ट्र पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रेम आहे. जनतेची निष्ठा आहे. महाराष्ट्रात असा प्रसंग पवार साहेबांनी देखील पाहिला नसेल. पंतप्रधानांनी ज्यावेळी हा निर्णय सांगितला त्यावेळी आम्ही एकत्र होता. त्यावर आम्ही करू असं अशिष शेलार यांनी सांगितलं.

 • 01 Jul 2022 12:16 PM (IST)

  नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्र्यांची आवराआवर सुरू, मुळ आस्थापनेत जॉईन होण्याचे आदेश

  1. - नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्र्यांची आवराआवर सुरू,
  2. - मंत्रालयात मंत्र्यांच्या केबिनमध्ये कागदपत्रे आणि इतर साहित्याची आवरा आवर सुरू,
  3. - मंत्र्याकडील कर्मचाऱ्यांना मुळ आस्थापनेत जॉईन होण्याचे आदेश काल देण्यात आले,
  4. - त्यापार्श्वभूमीवर आवराआवर सुरू झालीय

 • 01 Jul 2022 12:15 PM (IST)

  सागर बंगल्यावर भाजपा नेत्यांची वर्दळ, मित्रपक्षाचे नेते देखील फडणवीसांची भेट घेत आहेत

  1. सागर बंगल्यावर भाजपा नेत्यांची वर्दळ.
  2. देवेंद्र फडणवीसांच्या अभिनंदनासाठी सागरवर गर्दी
  3. भाजपचे आमदार, खासदार मित्रपक्षाचे नेते फडणवीसांची भेट घेतायेत

 • 01 Jul 2022 12:13 PM (IST)

  इतिहासाची पुनरावृत्ती, अभिनेत्री नगमाचे ट्विट

 • 01 Jul 2022 11:53 AM (IST)

  एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेर राज्य राखीव दल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे,अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उबाळे,विशेष शाखा उपायुक्त सुधाकर पठारे,झोन 5 उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड,वाहतुक विभाग उपायुक्त दत्ता कांबळे,इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेर राज्य राखीव दल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे..

 • 01 Jul 2022 11:48 AM (IST)

  गेल्या काही दिवसात राज्यघटना धाब्यावर बसवून कामकाज सुरु आहे - उल्हास बापट

  गेल्या काही दिवसात राज्यघटना धाब्यावर बसवून कामकाज सुरु आहे...मुख्यमंत्र्यांचा सल्ला राज्यपालांना बंधनकारक असताना, राज्यपाल मुख्यमंत्र्याशी कोणतीही चर्चा न करता निर्णय घेत आहे....गेली काही दिवस सुरु असलेला हा सर्व प्रकार हा लोकशाहीला मारक असल्याचं मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलयं....त्यांच्याशी यासंदर्भात बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांनी....

 • 01 Jul 2022 11:47 AM (IST)

  डीजेच्या तालात गुलालाची उधळण करत जल्लोष

  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर करमाळ्यात सुभाष चौकात भाजप व शिंदे समर्थकांनी जल्लोष केला.

 • 01 Jul 2022 11:45 AM (IST)

  माझा ईडीच्या चौकशीवरती विश्वास आहे - संजय राऊत

  मी आता चौकशीसाठी जातोय, मला असं वाटतंय. या देशातला नागरिक म्हणून...कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही. मी पळकूटा नाही त्यामुळे चौकशीला सामोरे जातोय. माझा विश्वास आहे ईडीच्या चौकशीवरती असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

 • 01 Jul 2022 11:24 AM (IST)

  कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

  कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

  महाराष्ट्र सजलाम- सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करू यात

  मुंबई दि. १: महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

  महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणतात की, हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊयात.

 • 01 Jul 2022 11:23 AM (IST)

  विधानसभेचं विशेष अधिवेशन एद दिवसांनं पुढे ढकललं! आता रविवारी अध्यक्षपदाची निवड होणार

  विधानसभेचं विशेष अधिवेशन एद दिवसांनं पुढे ढकललं! आता रविवारी अध्यक्षपदाची निवड होणार

 • 01 Jul 2022 11:23 AM (IST)

  इडीला सहकार्य करणार, सुडाचा भावनेनं हे सगळं होतं - संजय राऊत

  इडीला सहकार्य करणार, सुडाचा भावनेनं हे सगळं होतं… मी समर्थ आहे, मी एकटा जाईन, एकटा येईन असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. माझ्या शुभेच्छा आहेत.महाराष्ट्र आमचं राज्य आहे. राज्याला नवं सरकार मिळालं असेल तर आम्ही स्वागत करतो.,. ही राज्याची संस्कृती… आम्ही अडथळे निर्माण करणार नाही. नारायण राणेंना मुख्यमंत्री का केलं नाही. सोयिनुसार राजकारण केलं. शिवसेना फोडून त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. जिथे ठाकरे तिथे शिवसेना तिथे सुखाने नांदा…

 • 01 Jul 2022 11:20 AM (IST)

  संजय राऊत ईडीच्या चौकशीसाठी निघाले आहेत

  गाड्यांता ताफा संजय राऊत यांच्यासोबत आहे

  त्यांच्या गाड्यांचा ताफा आता शिवडी येथे आहे

 • 01 Jul 2022 11:06 AM (IST)

  मुळची शिवसेना आम्हीचं आहोत - शंभूराज देसाई

  शंभूराज देसाई

  बहुमत असल्यामुळे शपथविधी झाले आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही पाहतोय. यांची मागणी मुळात चुकीचं आहे. लोकांच्या मनातलं सरकार आहे. त्यावेळी लोकांनी युतीच्या नावानं मतदान केलं. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता अत्यंत खूष असल्याचं दिसतंय. आमची रोज एक बैठक होत असते. काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुध्दा ते आमच्या भेटीला गोव्याला आले. तुम्ही आता राज्याचं काम बघा असं आम्ही सांगितलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन शिंदे साहेबांनी कामाला सुरूवात केली. मोडता घालण्याचं काम सध्याच्या एका गटाने करू नये. आम्ही शिवसेना हे पहिल्या दिवसापासून सांगतोय. आम्ही शिवसेनेत आहे, मुळ आम्हीचं शिवसेना आहे.

 • 01 Jul 2022 10:58 AM (IST)

  ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची बँरबाजी

  ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची बँरबाजी... एक शिवसैनिक ते मुख्यमंत्री आशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सुद्धा बॅनर लावण्यात आले आहेत. वारसा प्रबोधनकारांचा अशा आशयाचे बॅनर सुद्धा लागले आहेत.

 • 01 Jul 2022 10:53 AM (IST)

  मी जोपर्यंत फडणवीस यांच्याशी बोलत नाही तोपर्यंत ते नाराज आहेत - संजय राऊत

  जिथे ठाकरे तिथे शिवसेना आहे. एकनाथ यांना शुभेच्छा...मी जोपर्यंत फडणवीस यांच्याशी बोलत नाही तोपर्यंत ते नाराज आहेत असं बोलणार नाही. अडीच वर्षांपूर्वी जो शब्द दिला त्याचे पालन आता केलंय असं आम्हाला वाटतंय. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे काम ज्यांनी केल त्यांना मोदी यांनी मुख्यमंत्री केल. कारण जर हे वर्षांपूर्वी जर केल असतं तर हे झालं नसतं. या किंवा त्या कारणाने मुख्यमंत्री केले असं मी म्हणालो. शिवसेनाचा मुख्यमंत्री झाला असं नाही म्हणालो फ्लोर टेस्ट बद्दल मी बोलणार नाही. ते आमचे प्रतोत बोलतील किंवा सभापती बोलतील. जोपर्यंत ते स्वतः ला शिवसैनिक म्हणतील तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवले जाईल...

 • 01 Jul 2022 10:50 AM (IST)

  विखे-पाटील यांची विधानसभा अध्यक्षपदाच्या नावासाठी चर्चा

  विखे-पाटील यांची विधानसभा अध्यक्षपदाच्या नावासाठी चर्चा

 • 01 Jul 2022 10:48 AM (IST)

  मुंबईचे नवे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर सागर बंगल्यावर दाखल

  मुंबईचे नवे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तसेच गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे.

 • 01 Jul 2022 10:48 AM (IST)

  शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

  1. शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
  2. 16 आमदारांच्या निलंबन प्रकरणात ११ जुलैला सुनावणी होणार

 • 01 Jul 2022 10:39 AM (IST)

  राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही - उल्हास बापट

  कुठल्याही राजकीय पक्षात मला रस नाही. राज्यपालांचे कुठलेही निर्णय घटनेला धरून नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. सगळं राज्यापाल्याचं वागणं अत्यंत चुकीचं आहे. एकनाथ शिंदे हे कुठल्या पक्षाचं आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंचा आहे. गट बाहेर पडला आहे. अद्याप तो गट कशात सामील झालेला नाही. अशा तरेची परिस्थिती कायम उद्धवणार...मुख्यमंत्र्यांचा सल्ला राज्यपालांना घ्यावाचं लागतो. सगळ्यांचे अधिकार समजले पाहिजे. मला पक्षात अजिबात रस नाही. मला लोकशाहीमध्ये सुद्धा रस नाही. नाही मला टेक्निकली असं वाटतंय की, जे बंडखोर आमदार आहेत. त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही असं उल्हास बापट यांनी सांगितलं.

 • 01 Jul 2022 10:33 AM (IST)

  ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टात शिवसेनेची बाजू मांडणार

  अरविंद सावंत कालचा निर्णय पाहिल्यानंतर महाराष्ट्राला प्रश्न पडेल. अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री द्या. त्यावेळी दिलं असतं, तर आज हे झालं असतं का ? कशाच्या आधारे मुख्यमंत्र्यांना सत्तास्थापनेसाठी बोलावलं.

  अतुल भातळकर

  एवढं सुद्धा उद्धव ठाकरेंना पाहवत नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला. पुन्हा एकदा सर्वोच्छ न्यायायलात जाणं म्हणजे सामान्य नागरिक मुख्यमंत्री झाल्याचे ठाकरेंना पाहावत नाही. राज्यपालांनी सांगितलं होतं की, बहुमत सिद्ध करा असं अतुल भातळकर यांनी सांगितलं आहे.

 • 01 Jul 2022 10:23 AM (IST)

  सर्वोच्छ न्यायालयाचा निकाल चुकीचा आहे - उल्हास बापट

  एका पाठोपाठ एक घटना घडत आहेत. न्यायालयात जे काही वाद झाला होता. राज्यपालांना मुख्य़मंत्र्यांना विचारावं लागतं. ठाकरे यांनी पहिलाच राजीनामा द्यायला पाहिजे होता. सर्वोच्छ न्यायालयाचा निकाल चुकीचा आहे. जसं ते आम्ही निलंबनाचं पुढं ढकलतो. कोर्टाचा निर्णय हा मला विसंगत वाटतोय.

 • 01 Jul 2022 10:18 AM (IST)

  राज्यातील नवं सरकार पुन्हा वादात सापडलं आहे ?

  राज्यातील नवं सरकार पुन्हा वादात सापडलं आहे ? नव्या सरकारविरोधात शिवसेना कोर्टात जाणार आहे. कालचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. कोणत्या अधिकारद्वारे बंडखोर आमदारांना सत्ता स्थापनेच निमंत्रण दिलं. याबाबत शिवसेना सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टात शिवसेनेची बाजू मांडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 • 01 Jul 2022 09:58 AM (IST)

  संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिल्या सुभेच्छा

  संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिल्या सुभेच्छा

  फडणवीसांशी बोलल्याशिवाय कळणार नाही ते नाराज आहेत की नाही - राऊत

  सोईनुसार राजकारण झालं - राऊत

  जीथे ठाकरे तिथे शिवसेना - राऊत

  नवा संसार सुखाने करा, राऊतांच्या शिंदेंना शुभेच्छा

  आम्ही सरकारच्या कामात अडथळे निर्माण करणार नाही - राऊत

 • 01 Jul 2022 09:37 AM (IST)

  RPI Meeting | चाळीसगावमध्ये RPI पक्षाची बैठक, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

  नाशिक मधील चाळीसगाव येथे काल आर पी आयची एक बैठक झाली. त्यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.

 • 01 Jul 2022 09:32 AM (IST)

  फडणवीसांच्या ट्विटर हॅंडलवर महाराष्ट्र सेवक असा उल्लेख

  फडणवीसांच्या ट्विटर हॅंडलवर महाराष्ट्र सेवक असा उल्लेख करण्यात आला आहे. काल त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या ट्विटर हॅंडलमध्ये बदल करण्यात आला आहे.

 • 01 Jul 2022 09:20 AM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरात अब्दुल सत्तार समर्थकांचा जल्लोष

  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरातही अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी प्रचंड मोठा जल्लोष केला यावेळी शहराच्या मुख्य चौकात या सगळ्या समर्थकांनी एकत्र येऊन शपथविधीचा कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर त्यांनी प्रचंड मोठा जल्लोष केला

 • 01 Jul 2022 09:18 AM (IST)

  संजय राऊत यांना ईडीकडे पैशांचा हिशोब द्यावा लागेल, किरीट सोमय्यांचं ट्विट चर्चेत

 • 01 Jul 2022 09:16 AM (IST)

  बहुमत चाचणी आधी मुख्यमंत्री शिंदेंसह सर्व आमदार मुंबईत येणार

  मागच्या अकरा दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर असलेले आमदार आज मुंबईत येणार आहेत.

 • 01 Jul 2022 09:12 AM (IST)

  BJP | भाजपच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडंटला होणार बैठक

  भाजपच्या आमदारांची आज ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे, त्यामध्ये दोन दिवस विशेष अधिवेशन होणार असल्याने त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. तसेच काल मंत्रीमंडळाबाबत बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 • 01 Jul 2022 09:09 AM (IST)

  Sharad Pawar | फडणवीस स्वत: मुख्यमंत्री होतील वाटलं होतं

  देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल असं अनेकांना वाटतं होतं. त्याचबरोबर शरद पवार यांना देखील फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं.

 • 01 Jul 2022 09:05 AM (IST)

  Sanjay Raut | 'तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य

  आज संजय राऊत हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत, त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

 • 01 Jul 2022 08:58 AM (IST)

  एकनाथ शिंदेंना एकनाथ खडसेंचा टोला


  1. एकनाथ शिंदेंना एकनाथ खडसेंचा टोला
  2. शिंदे सरकारचे बहुमत असलं तर अडीच वर्ष नक्की काढू शक्ते की? नाही हे न्यायालयाचा निर्णयाव कळेल
  3. शिंदे सरकारला सरकार चालवता मोठी तारेवरची कसरत करावी लागेल
  4. पुढे काळ ठरवलं हे सरकार किती वर्ष टिकेल
  5. शिंदेनीं म्हटलं तरी आम्ही शिवसेना पक्षाचे मात्र
  6. निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन केले त्यालाच पक्षाचे चिन्ह मिळतं
  7. शिंदे गटाचे अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही न्यायालयामध्ये प्रलंबित आहे
  8. त्यामुळे न्यायालयाचा निर्णयावर आल्यावर खरी शिवसेना कोणती? आणि खोटी कोणती? हे सिद्ध होईल
 • 01 Jul 2022 08:56 AM (IST)

  माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मातृशोक

  आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की,आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय दत्तात्रय (मामा)भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे. तरी आज दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 • 01 Jul 2022 08:54 AM (IST)

  Yashomati Thakur Farewell | यशोमती ठाकूर यांनी मंत्रालय कार्यालयातील सहकार्यांचा घेतला निरोप

  काल सायंकाळी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापण झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी मंत्रालयातील सगळ्या कर्मचाऱ्य़ांचा निरोप घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मागच्या अडीच वर्षापासून कर्मचाऱ्यांनी त्यांना चांगलं सहकार्य केलं होतं.

 • 01 Jul 2022 08:46 AM (IST)

  Ajit Pawar आणि Chhagan Bhujbal यांना कोरोनाची लागण

  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 • 01 Jul 2022 08:33 AM (IST)

  गोव्यात आज दुपारी शिंदे गटाची बैठक, भाजपच्या आमदारांची मुंबईत बैठक

  गोव्यात आज शिंदे गटाची बैठक, दुपारी सगळे आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. मंत्री मंडळाच्या विस्ताराची सगळ्या आमदारांना उत्सुकता लागली आहे. दुपारनंतर हे सगळे आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होतील. तसेच मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे.

 • 01 Jul 2022 08:29 AM (IST)

  संदीप देशपांडे यांचं सुचक ट्विट

 • 01 Jul 2022 08:28 AM (IST)

  CM Eknath Shinde | महिला आमदारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं औक्षण

  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या आमदारांना भेटण्यासाठी गोव्यात पुन्हा दाखल झाले. त्यावेळी त्यांना तिथं असलेल्या महिल आमदारांनी औक्षण दिलं...

 • 01 Jul 2022 08:17 AM (IST)

  Eknath Khadse | 'फडणवीस ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील'एकनाथ खडसेंचा टोला

  एकनाथ खडसे यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे. काल एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांच्या शैलीत फडणवीसांना टोला हाणला.

 • 01 Jul 2022 08:10 AM (IST)

  Sanjay Sawant on Eknath Shinde | जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांचा भाजपवर निशाणा

  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली आहे. जळगावचे जिल्हा संपर्क प्रमुख यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

 • 01 Jul 2022 08:08 AM (IST)

  Maharashtra political crisis | 2 आणि 3 जुलैला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन

  महाराष्ट्रात सत्ता बदलानंतर उद्या आणि परवा विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्यामुळं विशेष अधिवेशनात नेमकं काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 • 01 Jul 2022 07:56 AM (IST)

  आगामी निवडणुकांसाठी आर.पी.आय आठवले पक्षाची मोर्चे बांधणी सुरू

  आगामी निवडणुकांसाठी RPI आठवले पक्षाची मोर्चे बांधणी सुरू
  Anch:- आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आर.पी.आय. आठवले घटक पक्षाकडून चाळीसगाव मध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
 • 01 Jul 2022 07:55 AM (IST)

  यशोमती ठाकूर यांनी संपुर्ण स्टाफचा सत्कार करत घेतला निरोप

  राज्याच्या महिला व बाल विकास विेभागाच्या मंत्री तथा अमरावती पालकमंत्री म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळल्यानंतर आज मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकार्यांचा निरोप घेताना ॲड यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. स्वत औक्षण करत, शाल पांघरत प्रधान सचिव, खाजगी सचिव, विशेष अधिकारी, पोलिस स्टाफ यांचे पासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक यांचा सत्कार केला.
  अतिशय भावपुर्ण वातावरण झाले असताना ॲड ठाकूर म्हणाल्या की, आपण सर्वांनी गेले अडीच वर्ष दिलेली साथ मोलाची आहे. आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले, जनतेच्या भल्याची कामे केली. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे असणार आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेन असे ही आश्वस्त केले. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 • 01 Jul 2022 07:52 AM (IST)

  देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळाल्याने नागपूरकरांमध्ये नाराजी

  नागपुरचे पालकमंत्री पद आता कोणाला याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे. अनेक तर्क वितर्क सुरू आहेत. फडणवीस नागपूरचे पालक मंत्री होईल अशी चर्चा आहे. तर मंत्री पदासाठी सुद्धा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाही , त्यांना उप मुख्यमंत्री पद देण्यात आल्याने काहीशी नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आता नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस होईल अशी चर्चा सुरू

 • 01 Jul 2022 07:48 AM (IST)

  एकनाथ शिंदे यांनी संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मधील स्मारकाचे काम आणि भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाचे सुशोभीकरण काम जोरात चालू ठेवावं

  माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मधील स्मारकाचे काम आणि भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाचे सुशोभीकरण काम जोरात चालू ठेवावं... सचिन खरात

  मुंबई येथील इंदू मिल येथे संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम महाविकासआघाडी सरकारने जोरात चालू आहे त्यामुळे आता या सरकारने सुद्धा असंच हे काम चालू ठेवावं आणि भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ आहे हा विजयस्तंभाला महाविकासआघाडी सरकारने या विजयस्तंभाचा परिसर सुशोभीकरणासाठी 100 कोटी निधी जाहीर केला त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी करत आहे की हे दोन्हीही कामे अशीच चालू ठेवावी.

 • 01 Jul 2022 07:35 AM (IST)

  संजय राऊत ईडी कार्यालयात चौैकशीसाठी हजर राहणार

  संजय राऊत (Sanjay Raut) हे आज ईडी (ED) कार्यालयात दुपारी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहे. तसेच त्यांनी "मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. काळजी करू नका." असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही दिवसापूर्वी त्यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर रहावे अशी त्यांना नोटीस आली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वकीलामार्फत कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. आज सकाळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी काही दिवसांपासून वेगवान पद्धतीने घडत आहेत. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील अनेकांचे डोळे राजकीय घडामोडीकडे लागून राहिलेले आहेत. मी शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो असं देखील त्यांना ट्विट म्हटलं आहे. आज दुपारी त्यांची चौकशी झाल्यानंतर नेमकं काय होणार याकडे त्याच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

 • 01 Jul 2022 07:02 AM (IST)

  बंडखोर आमदार बालाजी कल्याणकरांच्या समर्थकांनी केली फटाक्याची आतिषबाजी

  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समर्थकांनी रात्री जल्लोष साजरा केलाय. कल्याणकर यांच्या घरासमोर बँड बाजाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी मोठया प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आलीय. आमदार कल्याणकर यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा समर्थकांत निर्माण झालीय, त्यातून समर्थकांचा उत्साह वाढलेला दिसून आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी या जल्लोषात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील या जल्लोषात सहभाग नोंदवला. त्यामुळे तब्बल अडीच वर्षानंतर सेना भाजप कार्यकर्ते एकत्र आल्याचे यावेळी दिसून आलय.

 • 01 Jul 2022 07:00 AM (IST)

  राज्यात पुन्हा सत्ता हाती आल्याने कुर्डूवाडीत भाजपाचा जल्लोष

  महाराष्ट्राचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता प्रस्थापित करुन दोघांचा ही शपथ विधी पार पडताच. कुर्डूवाडीत भाजपाच्या वतीने फटाके फोडुन पेढे वाटत घोषणाबाजी करीत कुर्डूवाडी शहर भाजपच्या वतीने फटाके फोडुन व पेढे वाढुन आनंद ऊत्सव साजरा झाला

 • 01 Jul 2022 06:56 AM (IST)

  गोव्यात पोहचल्यानंतर शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

  40 प्लस 10 आमदार यांच्यामुळे हा दिवस आला आहे. मी शपथ घेतल्यानंतर मी त्यांना पुन्हा भेटायला आलो आहे. त्यांचा मनाचा मोठे पणा, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना त्यांनी मुख्यमंत्री केले, पुढची रणनीती आम्ही ठरवू असं शिंदे यांनी गोव्यात पोहचल्यानंतर सांगितलं.

 • 01 Jul 2022 06:50 AM (IST)

  संजय राऊत आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

 • 01 Jul 2022 06:48 AM (IST)

  भाजप स्वतःला आता इतका उदारमतवादी दाखवत आहे - संजय सावंत

  एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये एकदा शिंदे यांना मुख्यमंत्री करतो म्हणून सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदे का नाही बोलले असा सवाल उपस्थित करत जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी हा सर्व प्रकार भाजपने केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान भाजप स्वतःला आता इतका उदारमतवादी दाखवत आहे. मात्र 2019 मध्ये भाजपने हे दाखवलं असतं तर आज ही स्थिती निर्माण झालीच असती अशी प्रतिक्रिया देत संजय सावंत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

 • 01 Jul 2022 06:44 AM (IST)

  शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

  शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. 2004 ते 2020 च्या निवडणूकीबाबत आयकरच्या नोटीसा आल्याची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाचं मला प्रमाणपत्र आलंय. या दरम्यानची माहिती सुदैवाने माझ्याकडे आहे. त्यामुळे मला चिंता नाही.

 • 01 Jul 2022 06:35 AM (IST)

  फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे भेटीला

  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी घेतली फडणवीसांची भेट. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सागर या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी गेल्याची माहीती प्रात्प झाली आहे.

 • 01 Jul 2022 06:30 AM (IST)

  एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदाचे फलक ठाण्यात झळकण्यास सुरवात.

  एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या मुख्यमंत्री पदी नियुक्ती होऊन शपथ विधी पार पडल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे हे ठाण्यातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. या वेळी शिंदे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशे, नाचून जल्लोष साजरा केल्यानंतर ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एकनाथ शिंदे समर्थक यांनी बॅनर लावण्यात आले. या बॅनर मध्ये देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो वगळता बॅनर वर हिंदुहृदयसम्राट बाळासहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो बॅनर वर लावण्यात आला आहे.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांनी.

 • 01 Jul 2022 06:24 AM (IST)

  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. गोव्यातील हॉटेल ताज कन्वेंशन मध्ये भेट घेऊन शिंदे यांचं केलं अभिनंदन. काल महाराष्ट्रात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा ते गोव्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

 • 01 Jul 2022 06:18 AM (IST)

  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या भेटीसाठी गोव्यात दाखल

  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या भेटीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्याच्या ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आमदारांनी घोषणाबाजी देखील केली. हॉटेल ताज कन्वेंशन मध्ये महिला आमदारांनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच औक्षण...

 • 30 Jun 2022 09:36 PM (IST)

  उद्धव ठाकरेंनी दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना शुभेच्छा

 • 30 Jun 2022 09:07 PM (IST)

  रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि परिस्थितीची माहिती घेतली. प्रलंबित प्रश्न, योजनांना पुढे घेऊन जाऊ असे शिंदे यांनी सांगितले आहेत. माजी मुख्यमंत्रीही सोबत आहेत, त्यामुळे जोरदार बॅटिंग करु असेही शिंदे यांनी सांगितले.

 • 30 Jun 2022 09:04 PM (IST)

  अजित पवारांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

 • 30 Jun 2022 09:01 PM (IST)

  शनिवारी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

  शनिवारी नव्या सरकारसाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारने बहुमत सिद्ध करावे, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. शनिवारीच विधानसभा अध्यक्षांचीही निवड केली जाणार आहे.

 • 30 Jun 2022 08:59 PM (IST)

  बंडखोर आमदार राज्यात असते तर काही तरी करु शकलो असतो-शरद पवार

  बंडखोर आमदार राज्यात असते तर काहीतरी करु शकलो असतो, असे वक्तव्य शरद पवार यांनी दिले आहेत. गुवाहाटीत३०० पेक्षा जास्त पोलिसांचा गराडा होता. त्या आमदारांना तिथून बाहेर पडता येत नव्हतं, असंही पवार म्हणालेत.

 • 30 Jun 2022 08:53 PM (IST)

  या सरकारबद्दल जनतेला विश्वास वाटायला हवा - शरद पवार

  मुंबई- मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचे नाव आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव हे धक्कातंत्र असण्याची शक्यता आहे. आत्ता जे केलं तेच २०१९ साली केलं तर अडीच वर्षांत जे घडलं ते घडलं नसतं. असं शरद पवार म्हणाले आहेत. या सरकारसमोर विश्वासहर्तता हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले.

 • 30 Jun 2022 08:40 PM (IST)

  शिवसेना संपुष्टात येईल असे वाटत नाही - शरद पवार

  शिवसेना संपुष्टात येईल असे वाटत नाही. चढ-उतार होतात. भुजबळ आमच्याकडे आले, ते सगळे पराभूत झाले. भुजबळांचाही पराभव झाला. राणेही बाहेर पडले, त्यांचाही पराभव झाला. संघटना अशी संपत नसेल.

 • 30 Jun 2022 08:35 PM (IST)

  फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली असे वाटत नाही- शरद पवार

  फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली असे वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरही ते दिसत होते. ते स्वयंसेवक आहेत, आदेश आल्यावर तोे पाळायचा असतो. हे त्यांचे संघाचे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांनी हे स्वीकारले असेल असे वाटते

 • 30 Jun 2022 08:30 PM (IST)

  एकनाथ शिंदे यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या- शरद पवार

  वरिष्ठांच्या आदेशामुळे फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. एकदा मुख्यमंत्री झाल्यावर अनेकांनी इतर मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. अशी उदाहरणे महाराष्ट्रातील आहेत.  त्यामुळे पडणवीसांबाबत वेगळे काही वाटले नाही. एकनाथ शिंदे हे ठाण्यातले असले तरी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्ह्याला लॉटरी लागली असे म्हटले तर ते वावगं ठरु नये. एकनाथ शिंदे आणि माझे त्यांचे फोनवरुन बोलणे झाले. त्यांना शुभेच्छा दिल्या. आता शपथ घेतलयानंतर ते राज्याचे प्रमुख होतो. त्यांच्याकडून चांगली कामगिरी व्हावी, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.  एकनाथ शिंदे शिवसेनेतील लोकांना बाहेर नेण्यात प्रभावी ठरले. ही साधी गोष्ट नाही. ही कुवत शिंदेंनी दाखवले. त्यातच त्यांचे यश आहे.

 • 30 Jun 2022 08:24 PM (IST)

  फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ, हा धक्का - शरद पवार

  शरद पवार यांची पत्रकार परिषद

  राज्यात नेतृत्व बदलाची बंडखोरांची मागमी असावी, आणि त्या बदल्यात कुणाला तरी काम करण्याची संधी मिळावी. जे आसाममध्ये गेले होते, त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा जास्त होती असे वाटत नाही. भाजपात जर आदेश आला दिल्ली किंवा नागपूरहून, तर त्या आदेशामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदेंना देण्यात आली. याची कल्पना शिंदेंनाही नसावी. दुसरं आश्चर्य हे की, आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडमवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता.

 • 30 Jun 2022 08:14 PM (IST)

  राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन

 • 30 Jun 2022 08:10 PM (IST)

  गोव्यात ताज हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांनी स्क्रीनवर टीव्ही9 च्या माध्यमातून पाहिला शपथविधी सोहळा

  गोव्यात असलेल्या बंडखोर आमदारांनी, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा ताज हॉटेलमध्ये मोठ्या स्क्रीनवर अनुभवला. टीव्ही9 मराठीवर त्यांनी हा शपथविधी सोहळा पाहिला. यावेळी शिंदे यांच्या विजयाची घोषणाबाजी करण्यात आली.

 • 30 Jun 2022 08:05 PM (IST)

  ज्युनियर मंत्र्यांच्या हाताखाली फडणवीसांना काम करावं लागेल-खडसे

  मुंबई- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता ज्युनियर मंत्र्यांच्या हाताखाली फडणवीसांना काम करावे लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

 • 30 Jun 2022 08:02 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शपथविधीनंतर ठाण्यात जल्लोष

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर, त्यांच्या ठाणे शहरात त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे. शिवसेनेचे झेंडे आणि गाणी लावून हा उत्साह साजरा करण्यात आला.

 • 30 Jun 2022 07:59 PM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन

 • 30 Jun 2022 07:55 PM (IST)

  फडणवीसांच्या अनुभवाचा सरकारला फायदा व्हावा, यासाठी सरकारमध्ये- मुनंगटीवार

  मुंबई - भाजपाचा कार्यकर्ता सत्तेसाठी काम करत नाही. देवेंद्रजींचे मन विशाल आहे. त्यामुळे पक्षाने जे सांगितले होते, तेच देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. फडणवीस हे आधी बाहेर राहणार होते, मात्र त्यांच्या पाच वर्षांचा अनुभवाचा फायदा शिंदे सरकारला व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. निर्णय बदलला नाही तर शिंदेंसोबत फडणवीस यांची जोड दिले असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

 • 30 Jun 2022 07:48 PM (IST)

  फडणवीसांच्या साथीने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

  देवेंद्र फडणवीसही सोबत आहेत,  राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 • 30 Jun 2022 07:45 PM (IST)

  प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे पालन करतो - फडणवीस

 • 30 Jun 2022 07:40 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

  मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी भाजपा नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी दुपारी जाहीर केला होता. मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांना आग्रह केल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन फोन आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

 • 30 Jun 2022 07:36 PM (IST)

  हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब, धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

  मुंबई- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 • 30 Jun 2022 07:33 PM (IST)

  शपथविधी सोहळ्याला सुरुवात, राज्यपाल पोहोचले

  मुंबई- राजभवनातील शपथविधी सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन झाले आहे. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली आहे.

 • 30 Jun 2022 07:28 PM (IST)

  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सोहळा

  मुंबई- राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरबार हॉलमध्ये शिंदे यांचे कुटुंबीय, समर्थक आणि भाजपाचे नेते दाखल झालेले आहेत. नेत्यांकडून घोषणाबाजी सुरु आहे.

 • 30 Jun 2022 07:21 PM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोनदा आलेल्या फोननंतर फडणवीसांचा निर्णय बदलला

  मुंबई- देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा फोन केल्यानंतर त्यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका आधी घेतली होती. मात्र आता केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाने ते मंत्रिमंडळात सामील होणार आहेत.

 • 30 Jun 2022 07:18 PM (IST)

  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचा थोड्याच वेळात शपथविधी

  मुंबई- राजभवनात दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरबार हॉलमध्ये अनेक नेते, मान्यवर पोहचले आहेत.

 • 30 Jun 2022 07:11 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार, सागर बंगल्यावरुन निघाले

  मुंबई- देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने नाराज झाले होते, अशी चर्चा आहे. त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. आता केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांची मनधरणी करत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी, असे सांगितले आहे. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे आणि फडणवीस हे दोघेही शपथ घेणार आहेत.

 • 30 Jun 2022 06:59 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार, जे पी नड्डा यांचे ट्विट

  मुंबई- देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे ट्विट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट करुन सांगितले आहे.

 • 30 Jun 2022 06:57 PM (IST)

  एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावरुन फडणवीस नाराज?

  मुंबई - एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यावरुन देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील आणि या सरकारमध्ये आपण बाहेरुन पाठिंबा देऊ, मंत्रिमंडळात असणार नाही, असे विधान देवेंद्र फडणवीसांनी काहीच वेळेपूर्वी केले होते. मात्र त्यानंतर काहीच वेळात भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या सरकारमध्ये फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारावे असा केंद्रीय निर्णय असल्याचे थेट सांगितले आहे. यावरुन आता भाजपातच वाद आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.

 • 30 Jun 2022 06:50 PM (IST)

  केंद्रीय नेतृत्वाचा उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह, फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा

  मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, असे भाजपाच्या केंद्रीय टीमने ठरवले असल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली आहे. याबाबत त्यांच्याशी बोलून त्यांना वैयक्तिक आग्रह केल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा असल्याचे सांगण्यात येते आहे. २०२४ च्या निवडणुकांची तयारी करावी, पक्षविस्तार करावा, अशी त्यांची इच्छा असल्याची माहिती मिळते आहे.

 • 30 Jun 2022 06:38 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे - जे पी नड्डा

  मुंबई- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे. केंद्रीय स्तरावर जे पी नड्डा यांनी हे सांगितले आहे. तर फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

 • 30 Jun 2022 06:26 PM (IST)

  एकनाथ शिंदेंनी राज्याला नव्या उंचीवर न्यावे - जयंत पाटील

 • 30 Jun 2022 06:23 PM (IST)

  एकनाथ शिंदेंच्या शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण

  मुंबई- एकनाथ शिंदे यांचा शपथविधी संध्याकाळी साडे सात वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आता उद्धव ठाकरे या सोहळ्याला जातात का, हे आता पाहावे लागणार आहे. एका शिवसैनिकाला जर मुख्यमंत्री करत असतील, तर त्याला पाठिंबा असेल, असा सूर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच्या भाषणात व्यक्त केला होता.

 • 30 Jun 2022 06:19 PM (IST)

  उपमुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावांची चर्चा

  मुंबई- एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असले तरी उपमुख्यमंत्री कोण होणार, याची आता उत्सुकता आहे. भाजपाकडून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावांची चर्चा आहे. हा निर्णय पुढच्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

 • 30 Jun 2022 06:16 PM (IST)

  ठाणेकरांसाठी मानाचा तुरा, धर्मवीर दिघेंचे स्वप्न पूर्ण झाले- ठाणेकरांच्या प्रतिक्रिया

  ठाण्यात लुईसवाडीतील एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला, फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंद व्यक्त करण्यात आला. एक ठाणेकर मुख्यमंत्री होतोय हा मानाचा तुरा आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

 • 30 Jun 2022 06:12 PM (IST)

  माझा मुलगा मुख्यमंत्री झाला आनंद झाला- शिंदेंच्या वडिलांची प्रतिक्रिया

  माझा मुलगा मुख्यमंत्री झाला त्याचा आनंद झाला, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी दिली आहे. शपथविधी सोहळ्याला येण्यासाठी ते निघालेले आहेत.

 • 30 Jun 2022 06:08 PM (IST)

  चौथा सातारकर मुख्यमंत्री झाला, शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन

 • 30 Jun 2022 06:03 PM (IST)

  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे षडयंत्र, काळ ठरवेल- अमोल मिटकरी

 • 30 Jun 2022 05:55 PM (IST)

  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणे हा सुखावह धक्का- जितेंद्र आव्हाड

  मुंबई- एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा  राजकारणात सुखदायक धक्का असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. आता ठाणे जिल्ह्याला न्याय मिळेल आणि ठाणेकरांचा विकास होईल, असेही आव्हाड म्हणाले आहेत.

 • 30 Jun 2022 05:43 PM (IST)

  एकनाथ शिंदे शपथविधीनंतर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाणार

  मुंबई - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

 • 30 Jun 2022 05:39 PM (IST)

  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे सगळे शॉकिंग, शिवसेनेची प्रतिक्रिया

  मुंबई-  हे सगळं शॉकिंग आहे, यावर अभ्यास केल्यावरच बोलता येईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या  मनीषा कायंदे यांनी दिली आहे.
  देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आहे. परंतु यावर काही सध्या बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
  उद्धव ठाकरे यांनी आधीच पर्याय हे दिले होते. त्यांची नेमकी काय खदखद होती हे माहित नाही, असेही कायंदे म्हणाल्या.
 • 30 Jun 2022 05:34 PM (IST)

  गोव्यात शिंदे समर्थक आमदारांचा जल्लोष

  गोव्यात असलेल्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर जल्लोष केला आहे. नाचत या सगळ्या आमदारांनी हा आनंद साजरा केला आहे. सूरत, गुवाहाटी आणि गोवा या सर्व प्रवासाचे सार्थक झाल्याची त्यांची भावना होती.

 • 30 Jun 2022 05:28 PM (IST)

  सत्तेचा मोह सोडायला फडणवीसांचे काळीज हवे - अतुल भातखळकर

 • 30 Jun 2022 05:21 PM (IST)

  हा निर्णय अनपेक्षित नव्हता, सर्व भाजपा नेत्यांचा निर्णय-पंकजा मुंडे

  मुंबई- एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा सर्व भाजपा नेत्यांनी मिळून घेतला, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे मंत्री त्यांच्यासोबत काम करतील, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. पक्षातील कार्यकर्तेही शिस्तबद्ध असल्याने हा निर्णय मान्य करतील, असे त्यांनी सांगितले

 • 30 Jun 2022 05:06 PM (IST)

  एकनाथ शिंदे यांचा शपथविधी छोटा असेल -फडणवीस

  मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आज संध्याकाळी साडे सात वाजता होणार आहे. मात्र पाऊस असल्याने हा छोटेखानी समारंभ असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांनी राजभवनावर येऊ नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

 • 30 Jun 2022 05:00 PM (IST)

  राज्यात मजबूत सरकार येईल- एकनाथ शिंदे

  मुंबई-  एक मजबूत सरकार येईल. मोदी, शहा आणि नड्डाजींचं पाठबळ मिळेल. ज्या राज्याबरोबर केंद्राची ताकद उभी राहते तिथे विकासात कोणताही अडथळा येणार नाही. हे सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कटिबद्ध आहे.

 • 30 Jun 2022 04:54 PM (IST)

  फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवून, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिली- शिंदे

  ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात, तेव्हा त्याचं आत्म परिक्षण करण्याची गरज होती. आपण तर नगरविकास मंत्री होतो, पण आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या समस्या होत्या. त्यासाठी प्रयत्न करुनही उत्तर मिळआले नाही, म्हणून निर्णय घ्यावा लागला. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्म करण्यासाठी निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांनी जो निर्णय घेतला. त्यांच्याकडे १२० आमदार त्यांच्याकडे आहे. खरेतर मुख्यमंत्रीपद ते घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिली. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांचे आभार मानतो. पदासाठी हे केलेले नाही. ही ऐतिहासिक घटना आहे. राज्याच्या विकासाला पुढे घेऊन जाऊ. मंत्रिमंडळात नसले तरी ते आमच्यासोबत आहेत. असा मोठेपणा दिसत नाही.

 • 30 Jun 2022 04:50 PM (IST)

  बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार-एकनाथ शिंदे

  मुंबई - आम्ही जो निर्णय घेतला, त्याबाबत बोललेलो आहे. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि आमदारांच्या मतदरासंघातील विकासकामे यासाठी पुढे निघालेलो आहेत. शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार आणि अपक्ष असे ५० आमदार आम्ही गेले काही दिवस एकत्र आहोत. एक वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षापूर्वी जे घडलं, ते आपल्याला माहित आहे. गेल्या काही काळात मुख्यमंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या, विकास प्रकल्प, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली. आपणही त्यांच्याशी चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारबाबत आमदारांमध्ये नाराजी होती. पुढच्या निवडणुकीत जिंकणं अवघड होतं. कुणाला काही पाहिजे, स्वार्थ न ठेवता हे सर्व घडले. मविआ सरकारच्या काळात काही निर्णय घेता येत नव्हते. नामांतरासारखे निर्णय आधीच व्हायला हवे होते.

 • 30 Jun 2022 04:43 PM (IST)

  राज्यात शिंदे सरकार येणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस मंत्रिमंडळात नाहीत

  मुंबई- राजभवनात भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर फडमवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे त्यांनी सांगितले. या सरकारच्या मंत्रिमंडळात फडणवीस नसतील अशीही घोषणा करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडे सात वाजता एकट्या एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली आहे.

 • 30 Jun 2022 04:37 PM (IST)

  एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये फडणवीस नाहीत

  एकनाथ शिंदे (Eknath Shinde Maharashtra new CM)यांच्या सरकारमध्ये फडणवीस असणार नाहीत, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे यांच्या एकट्याचा शपथविधी होणार आहे.

 • 30 Jun 2022 04:36 PM (IST)

  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील - फडणवीस

  मुंबई- राज्याला पर्यायी सरकार देण्याची गरज होती. त्यात भाजपा, एकनाथ शिंदेंचा गट आणि १६ अपक्ष यात आहेत. यात आणखी काही जण येत आहेत. ही तत्वांची लढाई आहे. महाराष्ट्राला पर्यायी सरकार देण्याची गरज होती-फडणवीस

 • 30 Jun 2022 04:33 PM (IST)

  नामांतराचे निर्णय़ पुन्हा घ्यावे लागतील-फडणवीस

  मुंबई - दाऊदशी संबंध असल्याच्या कारणावरुन जेलमध्ये गेलेल्या मंत्र्याचे मंत्रिपदही काढण्यात आले. राज्यपालांच्या पत्रानंतर कॅबिनेट घ्यायची नसते असे संकेत आहेत. मात्र शेवटच्या क्षणी नामांतराचे निर्णय घेतले. ते आता पुन्हा घ्यावे लागणार आहेत. -देवेंद्र फडणवीस

Published On - Jul 01,2022 6:41 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें