NMMC Election 2022 Ward 11 : नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचे कमळ, यंदा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 चे काय राहणार चित्र

| Updated on: Aug 04, 2022 | 6:33 AM

गेल्या पाच वर्षांमध्ये प्रभागातील किती प्रश्न मार्गी लागले आहेत, नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा मिळतात का ? यावरच यंदाच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने हद्द, लोकसंख्या तसेच प्रभागातील वार्डात आरक्षण कोणते हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाने महापालिका प्रशासनाने ही यंत्रणा वापरुन ही औपचारिकता ठरवण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज अंतिम टप्प्यात असून आता निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच चित्र स्पष्ट होणार आहे.

NMMC Election 2022 Ward 11 : नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचे कमळ, यंदा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 चे काय राहणार चित्र
नवी मुंबई महापालिका
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा असला तरी (New Mumbai Corporation) नवी मुंबई मात्र कमळ फुलवण्यात भाजपा यशस्वी झाले होते. 2017 च्या निवडणुकीत या दोन पक्षामध्ये चुरशीची लढत झाली होती. यामध्ये (BJP Party) भाजपाला यश मिळाले होते. पण गेल्या पाच वर्षात राज्याच्या आणि स्थानिक पातळीवरच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. याचा फायदा नेमक्या कोणत्या पक्षाला होणार हे आता (Corporation Election) महापालिका निवडणुकांमध्ये समोर येईलच पण प्रभाग क्रमांक 11 मध्ये मुद्दे गाजत आहेत स्थानिक पातळीवरचे. त्यामुळे राज्यातील घडामोडीचा प्रभागावर कितपत परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने प्रशासकीय सर्वतोपरी तयारी झालेली आहे. हद्द निश्चित आणि वार्डनिहाय असेलेली लोकसंख्याही ठरवण्यात आली आहे. तर प्रभागानिहाय आरक्षणही घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला की, गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छूक असलेले उमेदवार कामाला लागणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग 40 आहेत. तर दोन सदस्यीय प्रभाग एक आहे. गतवेळच्या निवडणुकीत वार्डनिहाय निवडणुक पार पडली होती. त्यामुळे या वार्डाचे नगरसेवक हे राजू रामा कांबळे हे आहेत.

नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र 11

गेल्या पाच वर्षांमध्ये प्रभागातील किती प्रश्न मार्गी लागले आहेत, नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा मिळतात का ? यावरच यंदाच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. निवडणुकीच्या अनुशंगाने हद्द, लोकसंख्या तसेच प्रभागातील वार्डात आरक्षण कोणते हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाने महापालिका प्रशासनाने ही यंत्रणा वापरुन ही औपचारिकता ठरवण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज अंतिम टप्प्यात असून आता निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच चित्र स्पष्ट होणार आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये 25 हजार 646 एवढी लोकसंख्या आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 4 हजार 152 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 2 हजार 65 एवढी लोकसंख्या आहे. त्यामुळे सर्वसाधारण मतदारांवरच येथील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.

अशी आहे प्रभागाची व्याप्ती

प्रभागाच्या हद्दीवरही तेथील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे आदेश येताच महापालिका प्रशासनाने हद्द ठरवून दिली आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रामुख्याने रबाळे पोलिस स्टेशन, पंचशील नगर, संभाजी नगर, अडवली भुतावली गाव, महापे गाव, हनुमान नगर, एमआयडीसी, गौतम नगर, कातकरी पाडा, श्रमिक नगर या भागाचा समावेश राहणार आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या प्रभागात यंदाच्या निवडणुकीत कोणाला संधी मिळते हे पहावे लागणार आहे.

प्रभागातील तीन वार्डाचे असे आरक्षण

वार्ड क्रमांक 11 (अ) अनुसूचित जाती
वार्ड क्रमांक 11 (ब) अनुसूचित जाती महिला
वार्ड क्रमांक 11 (क) सर्वसाधारण

महापालिकेचे असे आहे स्वरुप

नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 11 चे नेतृत्व हे राजू रामा कांबळे हे करीत आहेत. यंदा प्रभागनिहाय निवडणुका होणार आहेत. प्रत्येक प्रभागात तीन वार्ड राहणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत एकूण 122 नगरसेवक असून एकूण 41 प्रभाग आहेत. या महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग 40 आहेत. तर दोन सदस्यीय प्रभाग एक आहे. यंदाच्या निवडणुकीत नवी मुंबईत अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि महिलांसाठी 61 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या 11 लाख 20 हजार 547 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 00,067 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 18 हजार 913 एवढी आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे.

नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र. 11 ‘अ’

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजपा
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र. 11 ‘ब’

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रावादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

नवी मुंबई महापालिका प्रभाग क्र. 11 ‘क’

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
भाजपा
राष्ट्रवादी
शिवसेना
कॉंग्रेस
मनसे
इतर