Nitesh Rane : त्यांना आधी, त्यांचा कोटा कुठलाय तो विचारा, नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी

| Updated on: May 23, 2022 | 11:49 AM

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून नितेश राणे त्यांच्यावरती टीका करायची एकही संधी सोडत नाहीत. नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्यापासून नितेश राणे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती टीका केली आहे.

Nitesh Rane : त्यांना आधी, त्यांचा कोटा कुठलाय तो विचारा, नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी
नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – महाराष्ट्रातलं (Maharashtra) राजकारण काही दिवसांपासून अधिक तापलं आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनेकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती टीका केली आहे. आज त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. नितेश राणे कडून पहिल्यांदा राऊतांबाबत पहिल्यांदा अश्लिल भाषेत टिप्पणी केली आहे. “त्या संजय राऊतला तुम्ही किती महत्त्व देणार, आता सगळ्या जणांनी आम्ही आता ठरवलंय. उगात XXX लोकांना आपण महत्त्व नाही द्यायचं. तुम्ही राज साहेबांबद्दल ठाकरेबाबत बोलण्यापेक्षा, संजय राऊत कधी एकटं आयोध्या सोडा. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये फिरले तर त्यांची काय अवस्था होईल हे समजेल. पुरा दिवस फक्त पवार साहेबांची आणि अन्य लोकांची XXX करून आता परत एकदा खासदार झाले आहेत. पहिलं त्याचा कोटा कुठला हे त्यांना विचारा शिवसेनेच्या कोट्यातले आहेत की, राष्ट्रवादीच्या कोट्यातले” अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरती केली.

“दीघे साहेबांचं त्यांना नाव वापरायचं असेल, त्यांच्या विरोधात यांना काम करायचं

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून नितेश राणे त्यांच्यावरती टीका करायची एकही संधी सोडत नाहीत. नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्यापासून नितेश राणे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती टीका केली आहे. अनेकदा सरकारच्या विरोधात ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी अश्लिल भाषेत टिप्पणी केली आहे. “दीघे साहेबांचं त्यांना नाव वापरायचं असेल. त्यांच्या विरोधात यांना काम करायचं असेल. मग त्या चित्रपटाचं तुम्ही प्रमोशन का करताय. जी स्थिती चित्रपटात दाखवली आहे, तशी सध्या परिस्थिती ठाण्यात आहे का ? दीघे साहेबांनी ठाण्यात प्रत्येक ठिकाणी विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापणा केली. पण हा विकास दिव्यामध्ये दिसतोय का ? डान्सबार मटका सगळं सुरू आहे” अशी टीका नितेश राणेनी शिवसेनेवरती केली.

हे सुद्धा वाचा

100 कोटीचा दावा

आज किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांच्यावरती शंभर कोटीचा मानहाणीचा दावा केला आहे. यामध्ये संजय राऊत यांना माफी मागावी लागणार आहे.

तसेच दंड सुध्दा भरावा लागणार असल्याचे किरीट सोमय्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.