नवाब मलिकांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला, ईडीचे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता

त्यामुळे मलिक राजीनामा देणार नाहीत असं चित्र दिसतंय. कालपासून ईडीच्या कारवाईवरती अनेकांचं लक्ष असून आज ते मलिकांच्या घराची आणि गोवावाला कॅपाऊंडला भेट देणार असल्याने तिथल्या परिसरातला पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे

महेश घोलप | Edited By: sagar joshi | Updated on: Feb 24, 2022 | 4:26 PM
1 / 5
बुधवारी सकाळी नवाब मलिकांना ईडीच्या अधिका-यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून राजकीय वातावरण अधिक तापलं असल्याचं पाहायला मिळतंय. नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत न्यायालयाने ईडीची कोठडी देण्यात आली आहे

बुधवारी सकाळी नवाब मलिकांना ईडीच्या अधिका-यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यापासून राजकीय वातावरण अधिक तापलं असल्याचं पाहायला मिळतंय. नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत न्यायालयाने ईडीची कोठडी देण्यात आली आहे

2 / 5

त्यामुळे मलिक ईडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते आज मंत्रालय परिसरात धरणं आंदोलन करीत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

3 / 5

त्याचं मलिकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी भाजपने राज्यभर आंदोलनं सुरू केलं आहे.

4 / 5

तसेच मलिकांनी केलेला गुन्हा अद्याप सिध्द झालेला असं जयंत पाटील यांनी मीडियाला सांगितलं आहे, त्यामुळे मलिक राजीनामा देणार नाहीत असं चित्र दिसतंय. कालपासून ईडीच्या कारवाईवरती अनेकांचं लक्ष असून आज ते मलिकांच्या घराची आणि गोवावाला कॅपाऊंडला भेट देणार असल्याने तिथल्या परिसरातला पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

5 / 5

ईडी त्या जागांची चौकशी करणार असून तिथं काही पुरावे सापडतात हे पाहणार असल्याची माहिती मिळतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us