MNS : मनसेचं मिशन महापालिका निवडणूक, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक

| Updated on: Feb 10, 2022 | 11:56 AM

महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तयारीला लागली आहे. मनसेकडून महापालिका निवडणुकांची (Municipal Corporation Election) जोरदार तयारी करण्यात येत आहे.

MNS : मनसेचं मिशन महापालिका निवडणूक, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक
raj thackeray
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तयारीला लागली आहे. मनसेकडून महापालिका निवडणुकांची (Municipal Corporation Election) जोरदार तयारी करण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झालीय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्या तयार करण्यात आल्या असून समित्यांची घोषणा होणार आहे. दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी आयोजित करण्यात आली आहे. मनसेच्या आजच्या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी विविध समित्यांची स्थापना केली जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्यानिमित्त गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या उपस्थित मुंबईत बैठक घेण्यात आली होती. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक महापालिकेवर मनसेनं लक्ष केंद्रित केलं आहे.

मनसे महापालिका निवडणुकीसाठी समित्यांची घोषणा करणार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे.महा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्या तयार करण्यात आल्या असून आज समित्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सोबतच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेच्या मिशनवर पुणे महापालिका आहे. आज पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेल पुण्यातील नगरसेवकांची बैठक घेणार आहेत.बैठकीत प्रत्येक मतदारसंघ निहाय निरीक्षक नेमला जाणार असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीतील उमेदवारांबाबतही चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सध्या संघटनात्मक बांधणीवर जोर दिला आहे.

स्वबळावर लढण्याचा मनसेचा निर्णय

आगामी महापालिका निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत दिले होते. महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी दिले होते. आपली स्वबळाची तयारी असली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाल्याचं समोर आलं होतं.

इतर बातम्या :

पुण्याच्या पोलिस आयुक्तांच्या बदलीची मागणी – किरीट सोमय्या

तो माझ्यावर दगड भिरकावणार, हे पाहूनही पोलिसांनी काहीच केलं नाही, गृहसचिवांच्या भेटीनंतर सोमय्यांचा आरोप

Raj Thackeray lead MNS meeting started for preparations of Municipal Corporation Election