रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवणार

| Updated on: Mar 26, 2024 | 7:33 PM

शेतकरी नेते रविकांत तुपकर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. ते अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर यांनी मतदारसंघात कोणतीही कामे झाले नसल्याचा आरोप केला आहे.

रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष निवडणूक लढवणार
Follow us on

Loksabha election : शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. येत्या २ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सातगावमध्ये त्यांनी निर्धार मेळाव्यात याची घोषणा केली होती. रविकांत तुपकर यांनी लोकाग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

येथे २००९ पासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार आहेत. ते सध्या शिंदे गटात आहेत.  प्रतापराव जाधव यांच्या तीन टर्म पूर्ण होत आहेत. त्यांच्यापुढे आता रविकांत तुपकर यांचे आव्हान देखील असणार आहे. ही जागा जर भाजपकडे गेली तर प्रतापराव जाधव हे भाजपमधून निवडणूक लढवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

ते म्हणाले की, ‘गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, शेत मजुरांसाठी अपक्ष निवडणूक लढवत आहे. त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. नवीन चेहऱ्याच्या लोकं शोधत आहेत. लोकांनीच माझ्यासाठी ही निवडणूक ताब्यात घेतली आहे. येत्या 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. एका बाजूला हजारो कोटींचा मालक आणि दुसऱ्या बाजूला फाटक्या शेतकऱ्याचे लेकरू, अशी निवडणूक होणार आहे.’

‘सामान्य जनतेनेच माझ्यासाठी आघाडी घेतली आहे. लोक खर्च करत असून वर्गणी जमा करत आहेत. समोर कुणीही उमेदवार असू द्या, मात्र लोकांनी ठरविले की शेतकऱ्यांसाठी तुपकरला सभागृहात पाठवायचे. माझ्यासमोर कुणीही उमेदवार असेल तर लढत ही रविकांत तुपकर यांचेशीच असेल. माझ्या उमेदवारीमुळे मतदानाची टक्केवारी वाढेल.’


‘सांगण्यासारखे यांच्याकडे विकास कामे काहीच नाहीत. खामगाव ते जालना रेल्वे मार्ग आम्ही लहान पणापासून ऐकतो, मात्र झाला नाही. विद्यमान खासदार बद्दल लोक नाराज आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईल. निवडणूक आली की ते फक्त नारळ फोडतात. ताजमहालचे ही नारळ फोडतील. सगळ्यांची मते खाणार आणि फाईट माझ्याशीच आहे, काळया दगडावरील रेष आहे. हा विजय माझा नसेल पण गाव गाड्यातल्या लोकांचा असेल. विजय झाला तर सर्व सामान्य जनतेचा विजय असेल.’असे ही ते म्हणाले आहेत.