सुप्रिया सुळे यांचे नाव कुणी सुचवलं, शरद पवार यांनी सांगितलं; म्हणाले, अजित पवार नाराज नाही

चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्यात निर्णय घेण्यात आला. लोकआग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष पद देण्याच आल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुप्रिया सुळे यांचे नाव कुणी सुचवलं, शरद पवार यांनी सांगितलं; म्हणाले, अजित पवार नाराज नाही
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2023 | 5:45 PM

नवी दिल्ली : २३ जूनला पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. निवडणुकीत इतर विरोधी पक्षांना एकत्र आणणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं. पक्षाचं काम इतर राज्यात वाढवण्यात येणार आहे. महिन्यातून चार दिवस संघटना वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चर्चेतून सहकाऱ्यांना जबाबदारी देण्यात निर्णय घेण्यात आला. लोकआग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष पद देण्याच आल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रत्येक सहकाऱ्यांकडे पदाची जबाबदारी

राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी आतापासूनच कोणाच्या नावाचा विचार केलेला नाही. अध्यक्ष पद अजून रिक्त झालेला नाही. अध्यक्ष पद रिक्त झाल्यावर त्याविषयीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक सहकाऱ्याकडे पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार नाराज असल्याबाबतच्या वृत्ताला अर्थ नसल्याचा दावा पवार यांनी केला.

लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना जबाबदारी

अजित पवार यांच्यावर विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी आहे. अजित पवार नाराज नाहीत. त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या असल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रत्येक सहकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी नसल्याने, लोकांच्या आग्रहाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. सुप्रिया सुळे या लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या लोकसभेतील अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. तसेच दिल्लीजवळच्या राज्यांमध्ये त्याचा फायदा होईल.

धमकीचा योग्य तपास होईल

‘तुमचा दाभोलकर करु ‘ या धमकीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. धमकीचा योग्य तपास होईल, असे पवार यांनी सांगितले. त्यांनी याविषयावर अधिक भाष्य करणे टाळले. काल ही धमकी देण्यात आली होती. शरद पवार, संजय राऊत, सुनील राऊत यांना धमकी देण्यात आली होती.

अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले

अजित पवार यांनीच सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताला अर्थ नाही, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुप्रिया सुळे यांची निवड हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. गेल्या एक महिन्यापासून याविषयीची चर्चा पक्षातील सहकाऱ्यांमध्ये सुरु होती, असे पवार यांनी स्पष्ट केले. लोकांच्या आग्रहास्तव सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपद देण्यात आल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.