शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया काय?

शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी दिली.

शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया काय?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 3:31 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा धक्कातंत्राचा वापर केला. दिल्लीतील बैठकीत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची संयुक्तपणी नियुक्ती जाहीर केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. नवी दिल्लीत शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून त्यांनी हा निर्णय घेतला. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.

अनिल देशमुख म्हणतात, दोघेही अनुभवी नेते

माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी दिली. दोघांवरही वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी दिली आहे. दोघेही अनुभवी आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभा, लोकसभा यामध्ये अनेक वर्षांचा अनुभव आहे. सुप्रिया सुळे यांचाही लोकसभेमध्ये अनेक वर्षांचा अनुभव आहे. या दोन्ही नेत्यांना विभागून जबाबदारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी देशात, राज्यात मदत होईल.

निर्णय पक्षातील सर्वांना मान्य

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पक्षासाठी साहेबांच्या कामाचा भार विभागला जाईल. हे अतिशय चांगले झाले. इतर महत्त्वाचे नेते म्हणाले, मागे शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केली होती. पण, वयाचा आणि देशाचा विचार करता दोघांची निवड स्वागतार्ह आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदावर राहावं, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. हा निर्णय सर्व पक्षातील लोकांना मान्य असल्याचंही काही वरिष्ठ कार्यकर्ते म्हणाले.

अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणे टाळले

दोन नेत्यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. अजित पवार हे कार्यकारी अध्यक्ष होतील, असे काही जणांना वाटत होते. पण, शरद पवार यांनी यावेळी धक्कातंत्राचा वापर केला. प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारी अध्यक्षपदी निवड करून घराणेशाहीशिवाय दुसरेही अध्यक्ष होऊ शकतात, हे दाखवून दिले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.