Uddhav Thackarey : नुसता तिरंगा फडकवून देशभक्त होता येत नाही, काहींना भारतमाता आपलीच मालमत्ता वाटते, उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले

| Updated on: Aug 13, 2022 | 7:38 PM

काही लोकांना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे. कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमूळं 62 वर्षांपासून आहेत. त्या आधीपासून माझ्या आजोबांनी विचारांची पेरणी केली होती.

Uddhav Thackarey : नुसता तिरंगा फडकवून देशभक्त होता येत नाही, काहींना भारतमाता आपलीच मालमत्ता वाटते, उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP)चा चांगलाच समाचार घेतला आहे. नुसतं तिरंगा फडकवला म्हणून देशभक्त झालो. राष्ट्रभक्त झालो. आपल्याला वाटतं भारतमाताही जणू काही आपलीच मालमत्ता आहे. तिची खरी व्यथा, अस्वस्थ मनाच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम व्यंगचित्रकार करतो. ती व्यथा मांडण्याचं काम केलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले आहे. मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणाचा ओढा कायम राहिला आहे. व्यंगचित्रकार काय असतो. तो काय करू शकतो याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना (Shivsena) आहे. शिवसेना नसती तर मराठी माणूस आणि हिंदूचं काय झालं असतं हे लक्षात येतं, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं. मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला. मी का सांगतोय तर काही लोकांना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे. कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमूळं 62 वर्षांपासून आहेत. त्या आधीपासून माझ्या आजोबांनी विचारांची पेरणी केली होती.

मार्मिकच्या व्यंगचित्रांनी लोकांना जागं केलं

व्यंगचित्रकार काय करू शकतो. सुख आणि आनंद असं तुम्ही म्हणाल. बाळासाहेबांनी व्यंगचित्रं काढली तो काळ ६०चा. आता स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आहे. मार्मिक सुरू झाला तेव्हा स्वातंत्र्याचं वय होतं 13 वर्ष. आपण काय करू शकतो हा मुद्दा उपस्थित केला तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती. मुंबई मिळवली होती. किती काळ संघर्ष करायचा असं बाळासाहेब आणि काकांनी विचार केला. त्यांनी मार्मिक सुरू केलं आणि माणसं मिळू लागली. मुंबई मिळाली पण लोकांवर अन्याय होतच होता. त्यामुळे मार्मिकने अस्वस्थ मराठी माणसाला हात घातला. त्याला वाचा फोडली. काही लोकांना व्यंगचित्रं पाहून आनंद झाला असेल पण मार्मिकच्या व्यंगचित्रांनी लोकांना जागं केलं. अन्यायाला वाचा फोडली, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एक ब्रशचा फटकारा पडला तर निपचित पडलेली मने पेटून उठतात

एक ब्रशचा फटकारा पडला तर निपचित पडलेली मने पेटून उठतात हे बाळसााहेबांनी करून दाखवलं आहे. ही आपली शिवसेना आहे. व्यंगचित्रकारांना विनंती करतो, देशभरातील 1947 पासूनची व्यंगचित्रं गोळा करा. देशभरातील कार्टुनिस्टची कार्टुन गोळा करा. 47 सालापासून आपला प्रवास कसा सुरू झाला, हे दिसेल. मार्मिकची व्यंगचित्रं पाहतच मी मोठा झालो आहे. मार्मिक सोबतच मोठा झालो आहे. व्यंगचित्रं बदलतात, माणसं बदलतात, काळ बदलतो. पण परिस्थिती आहे तीच आहे. बाळासाहेबांची चित्रे 1980 ची अजूनही परिस्थितीला लागू करणारी आहे. माणसं बदलली, काळ बदलला तरी परिस्थिती तीच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Shiv Sena chief Uddhav Thackeray criticizes BJP over patriotism)