Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात एकही महिला नाही, सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधान मोदींना सवाल

| Updated on: Aug 09, 2022 | 12:50 PM

आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांवर विरोधकांही टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका करत थेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे.

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात एकही महिला नाही, सुप्रिया सुळेंचा थेट पंतप्रधान मोदींना सवाल
Follow us on

मुंबई : आज मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. त्यानंतर या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांवर विरोधकांसह भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही टीका केली. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही टीका करत थेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. “स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

21 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही!

36 पैकी 21 जिल्ह्यात एकही मंत्रिपद नाही. एका जिल्ह्यात दोन मंत्रिपदं तर एका जिल्ह्यात तर तीन मंत्रिपदं, जळगावात दोन मंत्री आणि औरंगाबादला तीन मंत्रिपदं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह आता शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री आहेत. त्यात 18 नवनिर्वाचीत मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडला. दरम्यान, एकही मंत्रिपद वाट्लाला न आलेल्या जिल्यांची संख्या 21 असून एकूण उर्वरीत 15 जिल्ह्याच्या वाट्याला किमान एकतरी मंत्रिपद आलंय.

टीईटी घोटाळ्याशी कनेक्शन उघड झाल्यानंतर अब्दुल सत्तारांचा मंत्रिमंडळातून पत्ता जवळपास कट झाल्याचे बोलले जात असतानाच शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागली, याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राजकीय दृष्ट्या विचार केल्यास भाजप आणि शिंदे सरकारने अत्यंत विचारपूर्वक मंत्र्याची पहिली लीस्ट बनवल्याचे दिसतेय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या शिंदे-भाजप सरकारकडून मुस्लिम मतदार दुखावला जाऊ नये म्हणून एकमेव मुस्लिम चेहरा असलेल्या अब्दुल सत्तारांना संधी देण्यात आल्याचं बोललं जातंय. तसेच मराठवाड्यात औरंगाबाद हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा समजला जातोय. त्यात सिल्लोड मतदार संघाची राजकीय गणितं जुळवण्यासाठी अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेल्याचं दिसून येतंय.