शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते, ‘या’ दहा जणांना स्थान

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते, या दहा जणांना स्थान
Anish Bendre | Updated on: Sep 08, 2020 | 8:52 AM

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Uddhav Thackeray announces list of official spokesperson of Shivsena)

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई)
धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

Follow Us