Prakash Ambedkar : अखेर महाविकास आघाडीत फूट, प्रकाश आंबेडकर बाहेर; पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा काय?

| Updated on: Mar 27, 2024 | 11:49 AM

प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? याची राजकीय जाणकारांना उत्सुक्ता होती. कारण त्यांच्या स्टेटमेंटवरुन त्यांची नेमकी भूमिका काय? हा प्रश्न निर्माण व्हायचा. अखेर आज या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची राजकीय भूमिका जाहीर केली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर प्रभावी ठरला होता.

Prakash Ambedkar : अखेर महाविकास आघाडीत फूट, प्रकाश आंबेडकर बाहेर; पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा काय?
Prakash Ambedkar
Follow us on

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येणार का? यासाठी चर्चा सुरु होत्या. प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकांना हजेरी लावत होते. अखेर या प्रश्नाच आज उत्तर मिळालं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. इतकच नाही, प्रकाश आंबडेकर यांनी काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी त्यांनी काही जागांची मागणी केली होती. पण मविआकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. संजय राऊत यांनी मविआला चार जागा देण्याची तयारी दर्शवली होती. अखेरचा प्रयत्न म्हणून वंचित बहुजन आघाडीला एक जागा वाढवून दिली. पण अखेर प्रकाश आंबेडकर यांनी आपला एकला चलो रे चा मार्ग पत्करला आहे.

प्रकाश आंबडेकर यांची ही भूमिका म्हणजे महाविकास आघाडीसाठी एक झटका आहे. कारण वंचितची राज्यामध्ये संघटनात्मक ताकद आहे. त्यांची काही लाख मत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर प्रभावी ठरत असल्याच दिसून आलं होतं. त्यामुळे वंचितची एकगठ्ठा मत मिळवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु होता. लोकसभा निवडणुकीत काही लाख मत खूप महत्त्वाची असतात. आता काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला ही मत मिळणार नाहीत. अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला होईल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर स्वत:चे उमेदवार निवडून आणू शकत नसले, तरी मविआचे काही उमेदवार त्यांच्यामुळे नक्कीच पडू शकतात.

प्रकाश आंबेडकरांना काय खंत होती?

मविआमध्ये सर्वात आधी उद्धव ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण नंतर उद्धव ठाकरे गटाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, अशी खंत प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली. प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला हजेरी लावायचे, त्यावेळी सुद्धा त्यांची अस्वस्थतता दिसून आली होती. त्यांच्या वक्तव्यावरुन खरोखरच ते मंविआसोबत जातील का? हा प्रश्न विचारला जायचा. आज या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे.